Sunday, September 9, 2012

अजंठा गुंफा: भाग 3


Latest Post

अजंठा गुंफा: भाग 3

अजंठा गुंफा: भाग 3

 
 
 
 
 
 
Rate This

  सातवाहन कालातील म्हणता येतील अशी 3 भित्तीचित्रे अजंठ्याच्या 10 क्रमांकाच्या गंफेत आहेत आणि ती अतिशय विद्रूप व खराब अवस्थेत असल्याने कॅमेर्‍याच्या सहाय्याने, झूम करून सुद्धा, त्यावरून तत्कालीन काहीही माहिती प्राप्त करण्याची सुतराम शक्यता नाही हे आपण आधी बघितले आहे. या मूळ 3 चित्रांवरून, ग्रिफिथ यांनी काढलेल्या चित्रांपैकी काही त्यांनी आपल्या पुस्तकात प्रसिद्ध केली होती. … Continue reading »

आणखी थोडे काही

  • बेंगलुरू शहरामध्ये, केंद्र सरकारच्या 'आधार' कार्डासंबंधीच्या संगणक कार्यप्रणाली विकसित करण्यासाठी एक कार्यालय आहे. तुषार आणि मॅट हे या कार्यालयात काम करणारे दोन तरूण. नोकरी लागल्यावर एकच सदनिका शेअर करण्याचे त्यांनी ठरवले व एकत्र रहायला लागल्यानंतर दोघांची चांगलीच मैत्री जुळली. दोघांचे पूर्वायुष्य तसे साधारण एकाच चाकोरीतून गेलेले! तुषार हा हरयाणामधील एका पोलिस अधिकार्‍याचा मुलगा! भारतातील शिक्षण पूर्ण झाल्यावर अमेरिकेतील पेनसिल्व्हानिया विद्यापीठातून पदवीधर झाल्यावर इनव्हेस्टमेंट बॅन्कर म्हणून 3 वर्षे अमेरिका व सिंगापूरला काम केलेला! मॅट हा आपल्या आईवडिलांबरोबर लहान वयातच अमेरिकेला स्थायिक झाला. अमेरिकेतील एम आय टी सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून त्याने शिक्षण घेतले. या दोन्ही तरूणांच्या मनाने घेतले की आपण भारतात परत जावे म्हणजे आपल्या देशाला आपला काहीतरी उपयोग होईल. त्याप्रमाणे ते परत आले व त्यांनी बेंगलुरूमध्ये ही नोकरी घेतली. (आणखी...)
  • सीबीआय ही सर्व प्रकारच्या गैरव्यवहारांची चौकशी करणारी भारतातली सर्वात श्रेष्ठ दर्जाची यंत्रणा मानली जाते. या सीबीआयचे महासंचालक श्री. ए.पी.सिंग हे गृहस्थ आहेत. आंतर्राष्ट्रीय पोलिस संघटना किंवा इंटरपोलने नुकताच " भ्रष्टाचार टाळण्यासाठी व अवैध रित्या जमा केलेला पैसा उघड करण्यासाठी इंटरपोलचा जागतिक कार्यक्रम " ( Interpol global programme on anti-corruption and asset recovery ) हातात घेतला आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या कॉन्फरन्सच्या उदघाटन प्रसंगी या सदगृहस्थांनी तुम्हाला आम्हाला माहिती असलेली एक गोष्ट परत सांगितली. मात्र त्यांनी या बाबत जी काही डिटेल्स दिली ती मोठी रोचक आहेत. (आणखी...)
  • मला आठवते की मागच्या वर्षी कधीतरी एक बातमी मी वृत्तपत्रांतून वाचली होती. कर्नाटकच्या सर्व आमदारांना स्मार्टफोन देण्यात येणार म्हणून!. त्या वेळेस मला थोडे आश्चर्यही वाटले होते की ही मंडळी हे स्मार्टफोन घेऊन काय करणार? पण राज्यासमोर असलेल्या निरनिराळ्या प्रश्नांची माहिती करून घेता यावी. त्यांच्या मतदारसंघांतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, शेती उत्पादन या सारख्या संख्या लक्षात ठेवता याव्या व मूलभूत स्वरूपाची माहिती स्वत:जवळ ठेवण्यासाठी हे स्मार्टफोन दिले गेले असल्याची माहिती या बातमीत दिलेली होती. पण 2 दिवसापूर्वी कर्नाटक विधानसभेत, सत्र चालू असताना, लक्ष्मण सावेदी, सी.सी.पाटील व जे. कृष्णा पालेमार हे तीन मंत्री आपल्या स्मार्टफोनवर अश्लील चित्रफीत बघत असताना त्यांचे चित्रीकरण टीव्ही वाहिन्यांनी करून आपल्या वाहिन्यांवरून प्रसृत केले व कोणत्या कारणासाठी या मंडळींना हे स्मार्टफोन खरे तर हवे होते याचा उलगडा झाला. (आणखी...)
  • काही वर्षांपूर्वी हैदराबादला गेलो होतो त्या वेळी, तिथले जगप्रसिध्द सालारजंग संग्रहालय नव्या वास्तूत गेले आहे असे समजल्याने, लक्षात ठेवून ते मुद्दाम परत बघायला गेलो होतो. तिथली दालने बघत असताना एका दालनात खुद्द निझाम व त्याचे सरदार यांचे रत्नखचित अंगरखे चौकटींच्यात मांडून ठेवलेले दिसले.ह्या अंगरख्यांवर सोन्या-चांदीच्या तारेने कशीदा तर काढलेला होताच पण त्या शिवाय निरनिराळी रत्नेही जडवलेली होती. दिव्यांच्या प्रकाशात हा कशीदा व रत्ने मोठी चमचम करताना दिसत होती. त्याच वेळी मनात विचार आला होता की असे चौकटीत मांडून ठेवलेले हे अंगरखे बघायला जरी मोठे मोहक दिसत असले तरी ते अंगाखांद्यावर वापरणे मोठे कर्म कठिण काम आहे. अंगाला तो कशीदा सारखा घासणार, ती रत्ने उठता बसताना टोचणार, वेळप्रसंगी अंगातून रक्तही काढणार. तेंव्हा त्यांच्यापासून मी लांब आहे तोच बरा. परवा सहज विचार करत असताना असे लक्षात आले की अरे! आपली नाती गोती पण या अंगरख्यांसारखीच आहेत की! जोपर्यंत ती लांब चौकटीत मांडलेली होती तोपर्यंत अशीच मनाला सुखद वाटत होती. अंगाखांद्यावर वावरण्याची वेळ आल्यावर ती पण अशीच घासू आणि टोचू लागली आहेत. एखादे वेळी ओरखडा व रक्ताचा थेंब सुध्दा दिसतो आहे. ग़ोत्यांत नेतात ती नाती हे मनाला पटू लागले आहे. (आणखी...)

Tuesday, September 4, 2012

आरक्षण : अखंड देश अस्तित्वा साठी गरजेचेच


रक्षणाच्या विरोधात बोलतांना अनेकांचा फार मोठा गैरसमज झालेला असतो. किंवा तो त्यांनी करून घेतलेला असतो. किंवा मग यात काय इतका विचार करायचा म्हणून गौण मानलेला असतो आणि म्हणून मग दुर्लक्षित. आरक्षण ही व्यवस्था भारता सारख्या विभिन्नातेने नटलेल्या (खरा पहिला  एका आर्थी 'भेदा-भेदाने' व्यापलेल्या ) देशाला अतिशय महत्वाची. आरक्षणाच्या विरोधात ओरड करणारे जास्तीत जास्त लोक त्याला व्यक्तिगत घेतात; माझा मित्र माझ्या पेक्षा डल्ल वगैरे होता आणि त्याला मेडिसिन मिळाले मी आयुर्वेदात घासतोय (औषधी ;) ) ! अशा आशयाची असतात. 
पण या देशाची मालमत्ता आणि साधन संपत्ती प्रत्येकाची सारखीच आहे. आता प्रत्येकाला ती बरोबर विभागून देता येत नाही. म्हणजे हे घे तुझे २ गुंठे, हा घ्या तुमचा खाणीचा तुकडा, हे इतके लिटर पाणी तुमचे वगैरे वगैरे विभागणी खऱ्या अर्थाने करता येत नसते. पण तसं पहिले तर ती इथे जन्म घेतलेल्या प्रत्येकाची सम-प्रमाणात असतेच. आणि समजा जमिनी जरी गुंठ्या गुठ्याने वाटून  घेतल्या तरी ज्यांच्या नावे सध्या सात-बारे आहेत ते त्या सोडायला तयार होतील का? आणि जमिनीच्या मालकीकडे पहिले तर का मग जमिनी तथा कथित उच्च वर्णीयांच्या नावे जास्त आहेत? ते जन्माला वगैरे लवकर आले होते का? तर नाही. इथच्या हजारो वर्षांच्या व्यवस्थेने आपोआप त्यांच्या सात-बाऱ्यावर त्या चढवलेल्या होत्या. तितकेच काय तर याच व्यवस्थेन सगळ्यात आधी शिक्षण ही यांच्याच नावे १००% आरक्षित केले होते. पुढे जो शिकलेला तोच नौकरीत, या नियमाने मग तिथेही जवळपास १००% च्या आस पास उच्च वर्नियांचेच आरक्षण. मग एकंदर व्यास्थेत सगळेच मुठभर समाजातील लोक आली. पण पुढे शिक्षणाच्या पाझराने, होय पाझरा-पाझरानेच,  वंचित समाज पुढे आला आणि मग ओघानेच प्रस्थापित व्यवस्थेतील लोकांशी साहजिकच स्पर्धा करू लागला. स्पर्धेत हारायचे नाहीच हीच सवय लागलेली असल्याने किंबाहुणा एकेकाळी व्यवस्थाच तशी बनवली गेली असल्याने हा अनेकांच्या सर सरळ पोटावर पाय होता आणि अजूनही आहे; याने मग अनेकांच्या मुखातून द्वेष बाहेर पडू लागला. पण तो द्वेष अज्ञानातून आहे. हा प्रचंड देश मोजकीच लोके सांभाळू शकत नाहीत. म्हणून समाजाच्या प्रत्येक स्थरातून इथे लोक पाहिजेत. म्हणून त्यांना प्रोस्साहन पाहिजे. आणि हक्कच पहिला तर लोकसंखेच्या प्रमाणात इथल्या सगळ्या क्षेत्रावर प्रत्येक समाजाचा जितका तितका हक्क आहे. 
आज जर खरच जातीनिहाय लोकसंख्या व्यवस्थेतील आणि संपत्तीतील वाट्यासहित 'नीट' मोजली तर आपल्याला थक्क करणारी आणि खरच आपण जाती व्यवस्थेमुळे किती अराजक माजवून ठेवले आहे हे दाखवणारी असेल. आरक्षणाच्या प्रश्नांवर चर्चाच हवी असल्यास ती वस्तू निष्ठा असावी. बिग पिक्चर समोर ठेवून असावी. गुणवत्ता वगैरेला काही धक्का बसत नाही. आणि कुठे आकडेवारीने गुणवत्तेला कसा धक्का बसतोय असे कुणी दाखवत असेल तर तिथल्या उच्चवर्णीय व्यवस्थापकांच्या बुरसटलेल्या आणि अजूनही १८ व्या शतकात जगणाऱ्या मेंदूलाही तपासून पहा, उत्तर तिथेच असते. 
या सगळ्यामागच एक कारण आहे, बाबासाहेब अजून कुणालाच नीट कळले नाहीत (म्हणजे आम्हाला ते पूर्ण कळाले असेही नाही). आणि सगळ्यात म्हत्वाचे तर उच्चवर्णीयांना कळले नाहीत. त्या माणसाने संविधान एका विशिष्ट वर्गा साठी लिहिलेच नव्हते. ते होते अखंड भारतासाठी. अतिशय दूरदृष्टी ठेवून. त्यामुळे त्यांनी जो पाया मांडलाय तो खूप खंबीर आहे. त्या पायावर खर तर स्वयंप्रकाशित आणि स्वयंपूर्ण समतावादी समाज निर्मिती करणे हे आपले सगळ्यांचे ध्येय असावे.  

(सांगण्याची गरज नाही, पण एका अर्थाने या प्रतीवादाला मदतच होईल म्हणून. कारण आरक्षणाचे समर्थान करणारे आरक्षण घेणारेच असतील असा हा फार मोठा गैरसमाज बाळगून आणि वेळ पडलीच तर 'तुम्ही कशाला नाही म्हणाला आरक्षणाला?' अशी चर्चेची बोळवण करून आम्हीच खरे असा आव आणला जातो म्हणूनही. मी जन्माने खुल्या वर्गातील जातीतून आहे)

-----
या लेखाची एक प्रतिक्रिया :
सडेतोड आणि सत्य लिखाण. सत्य बोलायला - लिहायला आणि वाचायला सुद्धा हिम्मत लागते. ती हिम्मत दाखवल्याबद्दल अभिनंदन.

काल टीव्ही वर एक कार्यक्रम बघतांना छान वक्तव्य कानी पडल, माननीय सर्वोच्च न्यायालयाने १९९२ मध्ये एका खटल्यात आरक्षणाचा खरा हेतू स्पष्ट केला होता तो असा..

आरक्षण म्हणजे काही "गरिबी हटाव" चा कार्यक्रम नाहीये, आरक्षणाचा मूळ हेतू म्हणजे वर्षानुवर्षे येथील सामाजिक परिस्थितीमुळे मागासलेल्यांना प्रत्येक क्षेत्रात प्रतिनिधित्व देणे हा होय. ज्या वेळी शासनाच्या आणि प्रशासनाच्या विविध स्तरावर आरक्षणामुळे वंचित घटकांना प्रतिनिधित्व मिळेल तेव्हाच ते एकूण या राष्ट्रीय विकासाच्या प्रक्रीयाम्ध्ये सहभागी होऊ शकतील, आणि हा देश - हि व्यवस्था माझी आहे अशी भावना त्याच्या मध्ये जागृत राहील.

आरक्षण म्हणजे काही चपराशी किंवा तत्सम नौकर तयार करण्याचे मध्यम नाहीये तर एकूणच निर्णय प्रक्रियेत सर्व घटकांना सामावून घेणे हे आहे. सबंध देशामध्ये आरक्षणामुळे हजारो वर्षे व या व्यवस्थेपासून दूर ठेवलेल्यांना या व्यवस्थेचा अविभाज्य घटक होता आलं आणि या द्वारे त्यांचा पर्यायाने भारतीय समाजाचा विकास झाला.

आरक्षण देतांना गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागासालेल्यांचे पण प्रतिनिधित्व असायला हवे, त्या साठी आर्थिक निकषांवर सुद्धा आरक्षण देता येऊ शकते पण आरक्षणाच्या मूळ सामाजिक हेतूला कुठलाही धक्का न लागू देता.

आरक्षणामुळे गुणवत्ता प्रभावित होते या तर्कालाही कसला आधार नाहीये, कारण आज देशाच्या सबंध निर्णय क्षमता असणाऱ्या पदांवर बोटावर मोजण्या इतकेच मागासवर्गीय अधिकारी आहेत आणि उर्वरित ९० टक्क्यांहून जास्त हे तत्सम उच्च वर्गातून आहेत तरी हि आपण एकूणच आपल्या प्रशासनाची गुणवत्ता बघू शकतो.

आरक्षण या विषयावर नेहमी वाद घालण्या पेक्षा त्या मागील मूळ हेतू समजून भारतीय समाज कसा मजबूत करता येईल हे सकारात्मक दृष्टीने पहिले पाहिजे.

अजूनही आदिवासी, भटके, विमुक्त आणि इतर मागासवर्गीय लोकांचे जीवनमान बघा.. कुठल्या संध्या त्यांना प्राप्त होतात, सर्व म्हणतात द्या न त्यांना संध्या, शिकायला पाठवा वैगेरे वैगेरे पण सत्य परिस्थती पहिली तर त्या सर्व कार्यासाठी लागणारा पैसा किती प्रमाणात दिला जातो हे हि पहिले पाहिजे. आणि मिळणाऱ्या पैश्यात ज्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो त्यातून कसा ह्या सर्व वंचितांचा विकास साधता येईल आणि कधी त्यांना समान स्तरावर आणता येईल याचा विचार अपान सर्वांनी करावा.



1 comment:

अमोल सुरोशे (नांदापूरकर) said...
सडेतोड आणि सत्य लिखाण. सत्य बोलायला - लिहायला आणि वाचायला सुद्धा हिम्मत लागते. ती हिम्मत दाखवल्याबद्दल अभिनंदन.


काल टीव्ही वर एक कार्यक्रम बघतांना छान वक्तव्य कानी पडल, माननीय सर्वोच्च न्यायालयाने १९९२ मध्ये एका खटल्यात आरक्षणाचा खरा हेतू स्पष्ट केला होता तो असा..

आरक्षण म्हणजे काही "गरिबी हटाव" चा कार्यक्रम नाहीये, आरक्षणाचा मूळ हेतू म्हणजे वर्षानुवर्षे येथील सामाजिक परिस्थितीमुळे मागासलेल्यांना प्रत्येक क्षेत्रात प्रतिनिधित्व देणे हा होय. ज्या वेळी शासनाच्या आणि प्रशासनाच्या विविध स्तरावर आरक्षणामुळे वंचित घटकांना प्रतिनिधित्व मिळेल तेव्हाच ते एकूण या राष्ट्रीय विकासाच्या प्रक्रीयाम्ध्ये सहभागी होऊ शकतील, आणि हा देश - हि व्यवस्था माझी आहे अशी भावना त्याच्या मध्ये जागृत राहील.

आरक्षण म्हणजे काही चपराशी किंवा तत्सम नौकर तयार करण्याचे मध्यम नाहीये तर एकूणच निर्णय प्रक्रियेत सर्व घटकांना सामावून घेणे हे आहे. सबंध देशामध्ये आरक्षणामुळे हजारो वर्षे व या व्यवस्थेपासून दूर ठेवलेल्यांना या व्यवस्थेचा अविभाज्य घटक होता आलं आणि या द्वारे त्यांचा पर्यायाने भारतीय समाजाचा विकास झाला.

आरक्षण देतांना गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागासालेल्यांचे पण प्रतिनिधित्व असायला हवे, त्या साठी आर्थिक निकषांवर सुद्धा आरक्षण देता येऊ शकते पण आरक्षणाच्या मूळ सामाजिक हेतूला कुठलाही धक्का न लागू देता.

आरक्षणामुळे गुणवत्ता प्रभावित होते या तर्कालाही कसला आधार नाहीये, कारण आज देशाच्या सबंध निर्णय क्षमता असणाऱ्या पदांवर बोटावर मोजण्या इतकेच मागासवर्गीय अधिकारी आहेत आणि उर्वरित ९० टक्क्यांहून जास्त हे तत्सम उच्च वर्गातून आहेत तरी हि आपण एकूणच आपल्या प्रशासनाची गुणवत्ता बघू शकतो.

आरक्षण या विषयावर नेहमी वाद घालण्या पेक्षा त्या मागील मूळ हेतू समजून भारतीय समाज कसा मजबूत करता येईल हे सकारात्मक दृष्टीने पहिले पाहिजे.

अजूनही आदिवासी, भटके, विमुक्त आणि इतर मागासवर्गीय लोकांचे जीवनमान बघा.. कुठल्या संध्या त्यांना प्राप्त होतात, सर्व म्हणतात द्या न त्यांना संध्या, शिकायला पाठवा वैगेरे वैगेरे पण सत्य परिस्थती पहिली तर त्या सर्व कार्यासाठी लागणारा पैसा किती प्रमाणात दिला जातो हे हि पहिले पाहिजे. आणि मिळणाऱ्या पैश्यात ज्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो त्यातून कसा ह्या सर्व वंचितांचा विकास साधता येईल आणि कधी त्यांना समान स्तरावर आणता येईल याचा विचार अपान सर्वांनी करावा.

युद्धकथा-…….जनरल मासाहारू होम्मावर चालवलेला गेलेला खटला… २ ….

युद्धकथा-2…….जनरल मासाहारू होम्मावर चालवलेला गेलेला खटला… २ ….

ज्या बटान डेथ मार्च वरून एवढा गदारोळ उठला होता तो कशामुळे झाला व त्यात काय झाले हे अगोदर बघून मग परत या खटल्याकडे वळू….
डिसेंबर १९४१ मधे झालेल्या पर्ल हार्बरवरच्या हल्ल्यानंतर जपानचे त्रेचाळीस हजार सैनिक जनरल मासाहारू होम्माच्या अधिपत्याखाली लूझॉनला उतरले. या सैन्याने दक्षिणेला असलेल्या फिलिपाईन्सच्या राजधानीवर आक्रमण केले. जपानी सैन्याचा आवेश व वेग बघितल्यावर अमेरिकन सैन्याचा कमांडर डग्लस मॅकार्थर याने मॅनिला शहर असंरक्षित म्हणून जाहीर केले. म्हणजे आता हे शहर लढविण्यात येणार नव्हते. अमेरिकन सैन्याने लवकरच हे शहर जपान्यांच्या दयेवर सोडून दिले. दरम्यानच्या काळात अमेरिकन व फिलिपाईन्सच्या सैन्याने बटानच्या द्विपकल्पावर माघार घेतली.
ही माघार घेताना जनरल मॅकार्थरने दोन मोठ्या चूका केल्या. त्यातील पहिली म्हणजे जपानी फौज त्याच्या फौजेपेक्षा प्रचंड मोठी आहे हे समजणे आणि दुसरी म्हणजे बटानवर माघार घेतलेल्या सैन्यासाठी पुरेशी रसद आहे हे गृहीत धरणे. परिस्थिती बरोबर उलटी होती, जपानचे सैन्य त्याच्या सैन्याच्या मानाने लहान होते आणि बटान वर असलेले अन्न तेथे असलेल्या सैनिकांनाच पुरेसे नव्हते. जेव्हा मॅकार्थरचे सैन्य बटानला पोहोचले तेव्हा त्यांची साहजिकच उपासमार सूरू झाली. या उपासमारीने त्रस्त झालेल्या सैन्याला घेऊन जपानच्या आक्रमक सैन्यावर प्रतिहल्ला करण्याचा त्यामुळे प्रश्नच नव्हता. राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी मॅकार्थरला युद्धभूमी सोडून ऑस्ट्रेलियाला जायची परवानगी दिली आणि या अडकलेल्या सैन्याला कोणी वाली उरला नाही. जपानच्या सैन्याने आक्रमक धोरण स्विकारून अमेरिकन सैन्याला सळो का पळो करून सोडले. ९ एप्रिलला उपासमारी, हगवण व मलेरियाने त्रस्त झालेल्या अमेरिकेच्या ७६००० सैनिकांनी जपानच्या ४३,००० सैनिकांच्यापुढे शरणागती पत्करली.
जनरल होम्माला या अमेरिकन युद्धकैद्यांची अडचण व्हायला लागली होती कारण या द्विपकल्पावरून तो कॉरेगिडीवर हल्ला करण्याच्या तयारीस लागला होता. येथे एक नमूद केले पाहिजे की जनरल होम्माचाही या बाबतीत अंदाज चुकला होता. त्याचा अंदाज होता बटानवर अमेरिकेचे साधारणत: चाळीस हजार सैनिक शरण येतील. त्याने या युद्धकैद्यांना हलवायची तयारी करायला त्याच्या पाच स्टाफ अधिकार्‍यांना सांगितले व त्यांनी अंदाजा एवढ्या सैनिकांना हालवायची योजना आखली होती. आता त्यांच्या समोर दुप्पट युद्धकैद्यांना हालवायचे आव्हान होते आणि त्यांचे सगळे नियोजन कोलमडले.
अमेरिकन सैनिक या द्विपकल्पावर पसरले होते. त्यांना गोळा करून बालांगा येथे न्यायचे व त्यांना अन्नाचा पुरवठा करायचा. तेथून त्यांना ३१ मैलांवर असलेल्या सॅन फर्नांडो येथे न्यायचे व येथे त्यांना रेल्वेमधे बसवायचे अशी या योजनेची साधारण रूपरेषा होती. शेवटी हे युद्धकैदी ९ मैल चालून कॅंप ओ’डोनेल येथे पोहोचणार होते. या मूळ योजनेमधे औषधोपचार व अन्नवाटपासाठी अनेक थांब्यांचा विचार केला गेला होता. ही युद्धकैद्यांची वाटचाल जनरल होम्माने १९२९ सालच्या जिनेव्हा करार लक्षात घेऊन आखली होती हे निर्विवाद. हे ऑपरेशन सुरू होण्याआधी जनरल होम्माने एक विशेष आदेश काढून युद्धकैद्यांना मैत्रीपूर्ण वागणूक द्यावी असा हुकूमही बजावला होता.
पण ही योजना कोलमडली आणि अशी कोलमडली की अखेरीस त्याची किंमत जनरल होम्माला त्याच्या प्राणांनी चुकवावी लागली.

ही योजना कोलमडली त्याची अनेक कारणे आहेत..एक म्हणजे युद्धकैद्यांच्या संख्येचा चुकलेला अंदाज. दुसरे म्हणजे बटान एप्रिलपर्यंत पडणार नाही हा जपानी अधिकार्‍यांचा अंदाज. या अंदाजामुळे युद्धकैद्यांसाठी औषध, अन्नपाणी इ.ची तयारीच झाली नव्हती तिसरे कारण म्हणजे हे सगळे होईपर्यंत तेथे जपानच्या सैनिकांची संख्या ८०,००० झाली होती आणि त्यांच्याकडे त्यांच्याच सैन्याला पुरेल एवढे अन्न/औषधे नव्हते. अमेरिकेच्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांनी सैनिकांना एकत्र करण्याची जबाबदारी उचलली मात्र त्यांनी जपानच्या योजनेला सहकार्य करायला नकार दिला. एका अमेरिकन डॉक्टरने म्हटले, “ हे सैनिक नव्हते तर आजारी माणसे होती”
अमेरिकन युद्धकैद्यांना सरसकट वाईट वागणूक मिळाली हे खोटे आहे. काही नशीबवान युद्धकैद्यांना ट्रकमधून नेण्यात आले पण बहुसंख्य सैनिकांना चालवत नेण्यात आले. युद्धकैद्यांच्या काही तुकड्यांना जास्त अन्न मिळाले तर काहिंना बिलकूल नाही. काही जपानी सैनिक युद्धकैद्यांना मानाने वागवत तर काहींनी अत्यंत निर्दयपणे आपल्या संगिनी चालवल्या. जपानी सैनिक अमेरिकन सैनिकांची हेटाळणी करत कारण त्यांच्या लष्करी नियमात शरणागती हा शब्दच नव्हता. या भयानक प्रवासातून फक्त मृत्यूच सुटका करू शकत होता. दहा हजार सैनिक या प्रवासात मृत्यूमुखी पडले.
ज्या जपानी सैनिकांनी क्रुरतेने युद्धकैद्यांना वागवले त्याचा अभ्यास करून कारणे शोधण्यात आली. एक तर जपानी सैनिक त्यांच्या शत्रू इतकेच या युद्धाने वैतागलेले होते. त्यांचेही सोबती त्यांच्या डोळ्यादेखत मृत्यूला कवटाळत होते. शरणागती ही एक बेशरमेची बाब आहे असे त्यांची संस्कृती असल्यामुळे त्यांना या शरण आलेल्या अमेरिकन सैनिकांचा मनस्वी तिरस्कार वाटत असे. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे जपानी अधिकार्‍यांचा तुटवडा. यांची संख्या जास्त असती तर कदाचित वेगळी परिस्थिती असती. तिसरे कारण होते जनरल होम्माला मदत म्हणून पाठविण्यात आलेले कनिष्ट अधिकारी. यांची मने वंशद्वेशाने भरलेली होती.
जनरल होम्माने त्याच्यावर चालवलेल्या खटल्यात “तो पुढच्या आक्रमणाच्या तयारीत इतका गुंतला होता की या युद्धकैद्यांचे व्यवस्थापन त्याच्या डोक्यातच नव्हते.” असे प्रतिपादन केले. हे खरे असण्याचा संभव नाकारता येत नाही. या डेथ मार्च नंतर काहीच दिवसांनी होम्माच्या सैन्याने कॉरिगिडॉरवर आक्रमण केले. तेथे लढत असलेल्या अमेरिकन सैन्यानेही ८ मे १९४२ रोजी शरणागती पत्करली. याच सुमारास जनरल होम्मालाही जपानला परत बोलाविण्यात आले. उरलेले युद्ध त्याने जपानच्या माहिती व तंत्रज्ञान या खात्याचा मंत्री म्हणून व्यतीत केले.
या डेथ मार्चची बातमी १९४४च्या जानेवारीत अमेरिकेत पोहोचली ती या द्विपकल्पावरून फिलिपाईन्सच्या भुमिगत बंडखोरांनी सोडवलेल्या अमेरिकन सैनिकांकडून. या मार्चची वर्णने जेव्हा वर्तमानपत्रात प्रकाशीत झाली तेव्हा अमेरिकेत संतापाची एकच लाट उसळली आणि या घटनेचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली जाऊ लागली……
जपानने २ सप्टेंबर १९४५ ला शरणागती पत्करली. अमेरिकन सेनाधिकार्‍यांनी जनरल होम्माला टोक्योजवळील एका युद्धकैद्याच्या छावणीत डांबले व तेथेच बटानच्या डेथ मार्चमधील त्याच्या सहभागाची चौकशी करण्यात आली. जपानच्या सरकारने जनरल मॅकार्थरला खूष ठेवण्यासाठी (आता तो दोस्त राष्ट्रांच्या सेनादलाचा सूप्रीम कमांडर झाला होता) होम्माचे पद व शौर्यपदके काढून घेतली. जनरल मॅकार्थर याच्या मागे असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. डिसेंबरमधे मग त्याला मॅनिलाला हलविण्यात आले.
खटला उभा राहिला आणि बचावपक्षाच्या वकिलांनी अव्यवहारीपणे या खटल्याच्या प्रक्रियेबद्दलच शंका उपस्थित करून हा खटलाच रद्दबादल कसा करता येईल याकडे लक्ष पुरवले. पहिल्याच फेरीत जॉर्ज फरनेसने जनरल डग्लस या न्यायालयाच्या प्रमुखपदी कसा राहू शकतो याबद्दल शंका उपस्थित केली. तो म्हणाला, “एकच माणूस फिर्यादी, फिर्यादीचा वकील, न्यायाधीश, ज्यूरी आणि शेवटचा निर्णय घेणारा या पदावर कसा काम करू शकतो. ज्याने आरोपीच्या सैन्याकडून पराभव पत्करला आहे त्याच्या लढाईतील गुन्ह्याबद्दलच्या खटल्यात असा माणूस निरपेक्षपणे या भूमिका निभवू शकेल यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.”
अर्थात हा मुद्दा एकमताने फेटाळण्यात आला. आरोपीच्या वकिलाने हा मुद्दा उपस्थित करायचे धाडसच कसे केले असे विचारून त्याला गप्प करण्यात आले व त्याला त्याची या प्रश्नाचे स्वरूप “आरोपीने ज्याचा पराभव केला आहे” ऐवजी “आरोपीला ज्याने युद्धात विरोध केला आहे” असे बदलायला सांगितले.

त्यानंतर पेल्झने दुसरा मुद्दा मांडला. फिर्यादी पक्षाने ऐकीव माहितीवरून कागदपत्रे तयार केली आहेत व ती या न्यायालयासमोर मांडायला परवानगी देऊन न्यायालय विरूद्धपक्षाला जरा अनाकलनीय सवलत देत आहे असा जोरकस मुद्दा मांडताना तो म्हणाला, “अनेक अमेरिकन सैनिकांची गोळा केलेली प्रतिज्ञापत्रके येथे पुरावा म्हणून दाखल केली गेली आहेत. अमेरिकन कायद्याचा ज्याचा अभ्यास आहे त्याला हा मोठा धक्काच आहे. त्या सैनिकांना येथे प्रत्यक्ष साक्ष द्यायला बोलावायला पाहिजे होते असे आमचे म्हणणे आहे. या आरोपीचा साक्ष देणार्‍यांची उलटतपासणी करायचा मुलभूत हक्क त्यामुळे डाववला जातो आहे.”
अर्थात पेल्झचे हेही म्हणणे ताबडतोब फेटाळून लावण्यात आले. या पाच न्यायाधीशांपैकी एक जनरल ऑर्थर ट्रूडॉ याने काही वर्षानंतर कबूली दिली की प्रतिज्ञापत्रकाला पुरावे मानायला त्याला जड जात होते पण त्याला जनरल मॅकार्थरकडून सक्त सुचना होत्या की जर साक्षीदार पुढे आले नाहीत तर या पत्रांचा वापर करायला लागला तरी हरकत नाही पण…मला वाटते आम्ही एक वाईट प्रथा पाडली आहे.”

प्राथमिक वादविवाद झाल्यावर फिर्यादी पक्षाने साक्षीदार बोलाविण्यास सुरवात केली. जसे जसे साक्षीदार पिंजर्‍यात येऊन त्यांच्या भयानक कहाण्या सांगू लागले तसे ज. होम्मा खिन्न दिसू लागला. संध्याकाळी त्याचे वकील घरी गेल्यावर तो शांतपणे सिगरेट ओढत त्याच्या घरी पत्रे लिहित बसे किंवा कोळशाने रेखाटने करत बसे. त्याने एक बाडही लिहीले होते जे त्याने शेवटी त्याचा रक्षक मित्र कॅप्टन कार्टरच्या स्वाधीन केले. हे इंग्रजी मधे लिहिलेले त्याचे आत्मवृत्त होते. त्याच्यावर त्याने स्वहस्ताक्षरात “My Biography : Masaharu Homma” असे लिहिले होते.
Flashback…
जनरल मासाहारू होम्माला खरे तर लेखक व्हायचे होते. लहानपणी त्याचे ध्येय तो हेच सांगायचा. कवीमनाचा असल्यामुळे हायस्कूलमधे असतानाचा त्याच्या काही कथा व कविता प्रतिष्ठीत मासिकांमधे प्रकाशीत झाल्या होत्या. दुर्दैवाने १९०५ मधे रशियाशी जपानचे युद्ध सूरू झाले, त्यावेळी त्याचे वय होते १७. सगळ्यांचा देशाभिमान टोकाला पोहोचला होता आणि त्याच भरात त्याने जपानच्या “मिलिटरी एकॅडमी” मधे प्रवेश मिळवला. १९०७ साली तो त्या कॉलेजमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन अधिकारी झाला.
काहीच वर्षात होम्मा जपानच्या इंपिरीयल स्टाफ कॉलेज” मधूनही पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन बाहेर पडला. त्याचा वर्गमित्र होता “हिडेकी टोजो” हो! तोच ! जपानचा भावी पंतप्रधान ज्याने जपानला या युद्धात खेचले. होम्माला तो अजिबात आवडत नसे. “तो अत्यंत दुराग्रही होता आणि मला तो आवडत नसे. त्याहूनही त्याचे नाझी विचार आणि माझे व्यक्तिस्वातंत्र्य मानणारे विचार हेही अजिबात जुळत नसत”

१९१३ साली होम्माने एका प्रसिद्ध गेशाच्या तोशिको तामूरा नावाच्या मुलीशी लग्न केले. ब्रिटीश फौजेत असताना त्याने पहिल्या महायुद्धात भाग घेतला होता आणि जिंकल्यानंतर लंडनमधे झालेल्या विजयोत्सवाच्या मिरवणूकीमधेही त्याने भाग घेतला. त्याच वर्षाच्या शेवटी त्याला त्याच्या आईकडून एक भयंकर बातमी मिळाली ती म्हणजे त्याची पत्नी साडो बेट सोडून टोक्योला मुलांना घेऊन स्थायिक झाली आहे आणि तिने वेश्याव्यवसाय स्विकारला आहे. (कदाचित गेशा, वेश्या नसावी) होम्माने मुलांचा ताबा व घटस्फोटासाठी घसघसशीत रक्कम मोजली व मुलांना परत साडोला रवाना केले. त्यावेळी त्याच्या मित्राला त्याने लिहिले, “ माझ्या प्रेमाच्या अंत्यविधीचा खर्च मी उचलला आहे”
ब्रिटिश सेनेमधे काम केल्यानंतर त्याची नेमणूक जपानच्या लंडमधील वकिलातीत लष्करी सहाय्यक म्हणून झाली. याच नोकरीत असताना त्याने युरोपभर प्रवास केला. १९२२ साली त्याला मेजर पदी बढती मिळून त्याची दिल्ली येथे जपानचा “रेसिडेंट ऑफिसर” म्हणून त्याची नेमणूक झाली. भारतात तो तीन वर्षे राहिला. त्याने भारताचे वर्णन “जगातील सगळ्यात आश्चर्यकारक देश” असे केले आहे.
१९२६ साली तो जपानला परत गेला व त्याने एका धनाड्य घटस्फोटीतेशी परत लग्न केले. तिचे नाव होते फुजिको तकाता. ही एका कागद कारखानदाराची मुलगी होती (सुंदरही होतीच) व जगभर फिरलेली व पाश्चात्य जगाशी ओळख असलेली स्त्री होती. होम्मा सेनादलात वर चढतच होता. १९४१ साली टोजो पंतप्रधान झाला आणि अचानक युद्धाचे वारे वहायला लागले. १९४१ च्या नोव्हेंबरमधे होम्माला जपानच्या चौदाव्या इंपिरियल आर्मीची सुत्रे स्विकारण्यास सांगण्यात आली आणि त्याच्यावर फिलिपाइन्स जिंकण्याची जबाबदारी टाकण्यात आली.
मासाहारू होम्माने त्या पुस्तकात लिहिले होते, ’ अमेरिकेच्या विरूद्ध युद्ध पुकारणे म्हणजे स्वत:चा नाश ओढवून घेणे. टोजोला एंग्लो-सॅक्सन वंशाची कल्पना नाही ना त्याला त्यांची ताकद माहिती आहे. चीन बरोबरच्या लांबलेल्या युद्धाने जपानची अगोदरच दमछाक झालेली होती त्यातच अमेरिका व इंग्लंडशी युद्धाचा विचार करणे हे शुद्ध वेडेपणा होता.”
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा खटला बर्‍यापैकी जनरल होम्माच्या विरूद्ध गेलाच होता याला कारण होते होणार्‍या काही साक्षी. या साक्षीदारांनी त्यांनी पाहिलेल्या शिरच्छेदांची, जिवंत पुरलेले मरणोन्मूख सैनिक, बलात्कार, कत्तली अशा भयानक प्रकारांचे इतके प्रभावी वर्णने केली की ऐकणार्‍याच्या काळजाचा थरकाप उडेल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे फिर्यादी पक्षाला या डेथ मार्चच्या रस्त्यापासून जनरल होम्माचे मुख्यालय फक्त पाचशे फूटावर होते हे सिद्ध करण्यात यश आले.
दुसर्‍या बाजूला जनरल होम्माला या सगळ्या प्रकारांची माहीती होती असे सिद्ध करणारा एकही पुरावा फिर्यादी पक्ष सादर करू शकले नाही. सुरवातीला या साक्षीदारांच्या कहाण्या ऐकताना ज. होम्मा “खोटे आहे” अशा अर्थाने जोरजोरात मान हलवत असे. पण जशा अनेक कहाण्या उजेडात येऊ लागल्या तसा त्याचा चेहरा बदलला व त्याने जमिनीवर डोळे लावले. काही वेळा तो त्या कहाण्या ऐकून डोळ्यांना रुमालही लावत असे. पेल्झने त्याच्या रोजनिशीमधे लिहिले, “ तो या कहाण्यांनी तुटतोय हे मला दिसत होते.. होम्माला या अत्याचारांची कल्पना नव्हती यावर माझा पूर्ण विश्वास होता…” जनरल होम्माने हा खटला चालू असताना एक चिठ्ठी पेल्झकडे सरकवली त्यावर त्याने लिहिले होते,
“ माझ्या सैनिकांनी हे अत्याचार केले आहेत हे ऐकून मला धक्का बसला आहे. मला माझ्या सैनिकांची लाज वाटते”………
क्रमशः….

जयंत कुलकर्णी.
ही कहाणी पेल्झची मुलाखत ज्याने घेतली त्या लेखकाच्या लेखावर, Lack of Protection to war crime suspects under War Crimes Law of United States व वेळोवेळी काढलेल्या काही नोटसवर बेतलेली आहे…….

जनरल मासाहारू होम्मावर चालवला गेलेला खटला…….

जनरल मासाहारू होम्मावर चालवला गेलेला खटला…….

जनरल मासाहारू होम्मा.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
हा लेख लिहायचा मुळ उद्देश जेत्यांचा न्याय कसा असतो हे स्प्ष्ट करणे हा आहे. हा लेख वाचल्यानंतर युद्धात विजय महत्वाचा का असतो हे आपल्या लक्षात येईल. हा लेख वाचल्यावर आपल्या मनात बर्‍याच शंका निर्माण होतील त्याचे शंका निरसन करण्याचे प्रयत्न केला जाईल. बरेच प्रश्न उत्तर देण्यासाठी अवघड असतील याची कल्पना आहे……
१९४५ साली डिसेंबर महिन्याच्या सोळा तारखेच्या सकाळी ले. रॉबर्ट पेल्झ एका निर्दय माणसाला भेटायला निघाला होता. पेल्झ लष्करी न्यायालयाचा एक वकील होता आणि सध्या मॅनिला येथे त्याची बदली झाली होती. त्याच्या स्वप्नातही नव्हते की त्याला जपानी युद्धगुन्हेगारांवर चालवलेल्या खटल्यात भाग घ्यावा लागेल आणि ते सुद्धा आरोपीचा वकील म्हणून. अमेरिकेला फिलिपाईन्सच्या बटान बेटावर युद्धात अमेरिकेला पाणी पाजलेल्या जपानच्या सेनेचा सेनानी जनरल मासाहारू होम्मा याच्यावर सगळ्यात महत्वाचा खटला चालवला जाणार होता आणि कायद्याने त्याचे वकीलपत्र पेल्झला घेण्याचा हुकूम झाला होता. एका महिन्याच्या आत म्हणजे ३ जानेवारी १९४६ ला हा खटला उभा राहणे अपेक्षित होते.
एका शत्रूची बाजू मांडण्याची पेल्झला मनातून खरे तर भितीच वाटत होती. कारणही तसेच होते जनरल होम्माला बटानचा पशू म्हणून ओळखले जात होते. दहा हजार, अमेरिकन आणि फिलिपाईन्सच्या सैनिकांच्या उपासमारीने झालेल्या मृत्यूला त्याला जबाबदार धरण्यात आले होते. अमेरिकन सैन्याने शरणागती पत्करल्यावर त्यांना बटानपासून लुझॉनच्या छावणीत चालवत नेण्यात आले. या प्रवासात त्यांना पाणी व अन्न अशा चैनीच्या वस्तूही नाकारण्यात आल्या होत्या. या प्रवासाला जगात “डेथ मार्च ऑफ बटान” या नावाने ओळखण्यात येते. याची कल्पना आपल्याला खालील छायाचित्रांवरून येऊ शकेल.
डेथ मार्च ऑफ बटान-नकाशा….
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
उपासमार…..
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
मृत्यू….
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
पण त्या इतिहासात आत्ता जायला नको कारण मग या खटल्याची हकिकत बाजूला राहील. १९४५ च्या सप्टेंबर महिन्याच्या मध्यास जपानच्या सैन्याने शरणागती पत्करली आणि जनरल होम्मा जपानमधे अमेरिकन सैन्याच्या हाती लागला. त्याने हाराकिरी केली नाही हेही एक आश्चर्यच आहे. अमेरिकेने रातोरात त्याला गुपचूपपणे विमानाने मॅनिलाला हलविले आणि त्याच्यावर खटला भरवण्याचा निर्णय झाला. याच जनरल होम्माला पेल्झ आणि त्याचे चार सहकारी भेटण्यासाठी हाय कमिशनर पॅलेसमधे त्याच्या भेटीची वाट पहात बसले होते. हाच तो पॅलेस जो जनरल होम्माने दोनच वर्षापूर्वी आपले निवासस्थान व कार्यालय म्हणून वापरला होता.
दरवाजा उघडला आणि जनरल होम्मा आत आला. दिसायला रुबाबदार आणि वयाचा पत्ता न लागू देणारे त्याचे व्यक्तिमत्व कोणावरही छाप पाडेल असेच होते. (त्याचे त्यावेळी वय सत्तावन्न होते) जपानची उंचीची सरासरी सुधरवणारी त्याची सहा फूट उंची, व अंगात घातलेला पिवळसर झाक असलेला पांढरा सूट याने त्याच्या रुबाबात अजूनच भर पडली होती. आल्या आल्या जनरल होम्माने जपानी पद्धतीने त्याची वाट बघत असलेल्या वकीलांना लवून अभिवादन केले आणि त्याच्या कोटाच्या खिशातून त्याने एक कागद काढला.
“हे मी तयार केलेले भाषण आहे” असे म्हणून त्याने ते त्याच्या वरच्या पट्टीतील आवाजात पण ठाम व मृदू स्वरात वाचून दाखवले. वाचून झाल्यावर त्याने हजर असलेल्या पेल्झ आणि त्याच्या सहकार्‍यांचे त्यांच्या निपक्षपातीपणासाठी आभार मानले व अमेरिकन सेनादलाने त्याची बाजू मांडण्यासाठी वकील नियुक्त केल्याबद्दल सेनादलाचेही आभार मानले. जनरल होम्मा उत्कृष्ट इंग्रजी बोलत होता व त्याचे उच्चार ब्रिटिश वळणाचे होते.
मॅनिलाचे न्यायालय हे टोक्योमधे स्थापन होत असलेल्या न्यायालयापेक्षा भिन्न होते कारण मॅनिलाचे हे न्यायालय पूर्णत: लष्कराच्या अंमलाखाली चालणार होते. (असे पूर्वी कधी झाले नव्हते. परत एकदा असे न्यायालय स्थापन झाले ते अफगाणिस्तान आणि इराकच्या युद्धानंतर). जनरल होम्माला “तृतीय दर्जाचा” युद्धगुन्हेगार ठरवून पाच लष्करी न्यायाधिशांच्या समोर हा खटला चालवला जाणार होता. हा दर्जा ज्या सैनिकांनी युद्धभूमीवर अत्याचार केले त्यांना दिला जाई. हे खटले शक्यतो ज्या भूमीवर हे गुन्हे घडले त्याच भूमीवर चालवले जात. “ए” आणि “बी” हा दर्जा राजकारणी व वरीष्ठ अधिकार्‍यांना दिला गेला होता व वर निर्देश केलेल्या टोक्यो येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्यांच्यावर खटले भरले जाणार होते.
मॅनिलाचे न्यायालय व त्याच्या समोर चालणारे हे खटले त्यामुळे अटळ होते. मॅनिला येथे जिंकलेली सेना पराजित सेनेवर खटला चालवणार होती. दोस्त राष्ट्रांच्या सेनेच्या पॅसीफिक विभागाचा सर्वोच्च कमांडर जनरल डग्लस मॅकार्थर या खटल्यांची जागा, बचाव पक्षाची रचना, न्यायाधीश, साक्षीपुराव्यांचे नियम हे सगळे हा माणूस ठरवणार होता आणि ज्या माणसा विरूद्ध त्याने लढाई लढली व हारली त्याच माणसाच्या विरुद्ध.
जनरल होम्माविरूद्ध आंतरराष्ट्रीय युद्ध कायद्यानुसार एकंदरीत अठ्ठेचाळीस गुन्हे दाखल करण्यात आले होते पण या पहिल्याच भेटीत त्याने त्याच्या वकीलांना हे सर्व गुन्हे तो अमान्य करणार आहे हे निक्षून सांगितले. जपानच्या चौदाव्या आर्मीच्या कमांडर या नात्याने त्याची नैतिक जबाबदारी स्विकारायची तयारी होती पण हे गुन्हे घडले आहेत हेच त्याला माहीत नव्हते, तर तसा हुकूम करायची बात दुरच असे त्याचे ठाम म्हणणे होते. सगळ्या आरोपांपैकी बटान डेथ मार्चच्या संदर्भात असलेल्या आरोपामधे बचाव करणे सगळ्यात अवघड असेल हे त्याला माहीत होते. त्याच्या एकूण बोलण्यावरून असे वाटत होते की त्याला बटान डेथ मार्चची पुसटशीच कल्पना होती. “मला बटान डेथ मार्चबद्दल पहिल्यांदा कळाले ते अमेरिकन वार्ताहरांनी त्याबद्दल विचारल्यावर”.
जनरल होम्माचा द्वेष वाटण्या ऐवजी पेल्झ आणि त्याच्या सहकार्यांबना तो आश्चर्यकाररित्या आवडू लागला. पेल्झने त्याच्या रोजनिशीत नोंद केली, “ हा माणूस प्रसन्न व्यक्तिमत्वाचा आणि उच्च नीतीमत्ता असलेला आहे”.
नशीबाचे खेळ कसे असतात बघा, जनरल होम्मा हा युद्धाअगोदर जपानमधे पाश्चिमात्य देशांचा पाठीराखा व पूर्णपणे आंग्लाळेला म्हणून माहीत होता आणि त्यालाच अमेरिकेच्या ताब्यातील फिलिपाईन्सवर हल्ल्याचे नेतृत्व स्विकारण्याचा हुकूम झाला. युद्ध सुरू व्हायच्या अगोदर जनरल होम्मा ब्रिटनमधे जपानच्या वकिलातीत लष्करी सहाय्यक म्हणून काम करत होता.
जनरल होम्माची कहाणी ऐकून पेल्झ चाट पडला. ज. होम्माने जगभर प्रवास केला होता आणि ज्या माणसांना तो भेटला होता त्याची यादी बघितल्यावर कोणालाही झीट येईल. ज्या माणसांना भेटला त्यांच्याशी त्याची वैयक्तिक ओळख होती. तो पाचव्या जॉर्जच्या राज्याभिषेकाला हजर होता, पॅलेस्टाईन व अफगाणीस्तानला गेला होता आणि भारतात कैक वर्षे राहिला होता. तो भारतात असताना महात्मा गांधींनाही भटला होता. चर्चिल, मुसोलिनी या नेत्यांशी त्याची भेट झाली होती. अमेरिकेला त्याने अनेक भेटी दिल्या होत्या. अशाच एका भेटीत न्युयॉर्कच्या मेयरने त्याला नव्यानेच बांधलेल्या एंपायर स्टेट टॉवरच्या शेवटच्या मजल्यावर खास पाहुणा म्हणून नेले होते.
जनरल होम्माने त्याच्या बचावासाठी काळजीपूर्वक व अभ्यास करून मुद्दे तयार केले होते. त्याच्या विचारमग्न चेहर्‍यावर हा ऐतिहासिक खटला जिंकण्याचा निर्धार कायम दिसत असे. त्याच्या पहिल्या भेटीनंतर पेल्झने त्याच्या रोजनिशीत नोंद केली, “जनरल होम्मा मला शेवटच्या प्रवासाला निघालेल्या एखाद्या आजोबांसारखा भासला ” जनरल होम्माला त्याची ही शेवटची लढाई तो जिंकू शकत नाही याची कल्पना होती कारण त्याच्या एका नोंदीत त्याने लिहिले होते, “पराजितांना खरा न्याय मिळत नाही. मी गुन्हेगार आहे या ठाम गृहितकावरच ते खटला चालवतील याची मला पूर्ण खात्री आहे. वाचण्याची शक्यता नाही. कधी कधी रात्री मला उदास व हतबल असल्याची चीड येते”.
हा खटला संपल्यानंतर अनेक वर्षांनी जेव्हा रॉबर्ट पेल्झची मुलाखत घेण्यासाठी एक मुलाखतकार त्याच्या ऑफिसमधे गेला तेव्हा त्याचे वय जवळजवळ ८८ झाले होते. तो त्याची आवडती होंडूरासमधे तयार झालेली सिगार ओढत होता व त्याच्या टेबलावर जनरल होम्माचे त्याने स्वत: सही केलेले छायाचित्र होते. ते छायाचित्र हातात घेऊन त्याच्याकडे किलकिल्या नजरेने बघत म्हातारा पेल्झ त्या वार्ताहराला म्हणाला, “एकदम सभ्य गृहस्थ होता जनरल होम्मा ! एकदम छान माणूस !”
पेल्झबरोबर त्या खटल्यादरम्यान काम करत असलेले त्याचे उरलेले चार सहकारी केव्हाच स्वर्गवासी झाले होते. पेल्झ गंमतीने म्हणाला “ बरे झाले तुम्ही योग्य वेळी आलात नाहीतर तुम्हाला मला भेटायला स्वर्गातच यावे लागण्याची शक्यता होती.”
मॅनिलाचा युद्धज्वर अजून उतरला नव्हता. बटानच्या पशूबद्दल रोज नित्यनेमाने कहाण्या छापून येत होत्या. काही अतिरंजीत होत्या तर काहीत वाट्टेल ते लिहिले होते. या खटल्यावर याची छाया पडली होतीच तर पण या खटल्याला वैयक्तीक सूडाची एक सूक्ष्म झालरही होती. जनरल डग्लस मॅकार्थरने या युद्धभूमीवरून माघार घेत ऑस्ट्रेलियाला पळ काढला होता तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर उतरताना त्याने कडवटपणे प्रतिज्ञा केली होती “मी परतेन ! निश्चितच परतेन !” बटानचा डेथ मार्च होऊन चार वर्षे होऊन गेली होती पण कोणाच्याच मनातून तो अपमान जात नव्हता. सूडाच्या आगीची धग कमी न होता योग्य संधीची वाट पहात होती. ती आता आली. जरी मॅकार्थर दूर जपानमधे गूंतला होता तरी त्याचे अस्तित्व खटल्याच्या हरएक कोपर्‍यात, कागदाच्या कपट्यावर, त्या न्यायालयाच्या आवारात जाणवत होतेच.
आज ८८ वर्षांचा असताना पेल्झचे डग्लस मॅकार्थर बद्दल तेच मत होते – “एक अत्यंत अहमंन्य माणूस. एक चांगला सेनानी पण बदमाश !” आणि अशा माणसाने हे न्यायलय उभे केले होते……………….
जनरल डग्लस मॅकार्थर
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
जनरल होम्माच्या वकिलांना त्याला या घडलेल्या गुन्ह्यांची माहिती नव्हती एवढेच सिद्ध करून चालणार नव्हते कारण तसे केले तर हा खटला कमांडच्या जबाबदारीवर घसरला असता. युद्धभूमीवर सैन्याचा सेनानी असताना तो कागदोपत्री जरी निर्दोष ठरला असता तरी त्याला जे चालले आहे त्याची माहिती असायलाच हवी होती व त्यात त्याने हस्तक्षेप करायला हवा होता असे विरूद्धपक्षाने म्हणणे मांडले असते.
अमेरिकेच्या सेनेविरूद्ध लढणार्‍यांना नेहमीच वेगळा कायदा लावला जातो. हा कायदा जर कायदा असेल तर इराक व अफगाणीस्थानमधे अमेरिकन सैनिकांनी जे काय केले त्याबद्दल त्यांच्या कमांडरला दोषी ठरवायला पाहिजे होते. पण अमेरिकेच्या बाबतीत तसे होत नाही हे खरे ! असो !
पेल्झ या खटल्याच्या निमित्ताने जनरल मासाहारू होम्माला दोन महिने तरी रोज भेटत असे. तो, त्याचे सहकारी व मासाहारू होम्मामधे या भेटींमुळे बर्‍यापैकी जवळीक निर्माण झाली होती. या खटल्याचा निकाल लागल्यावर पेल्झने मासाहारू होम्माच्या निराश पत्नीला टोक्योला सोडले. या भेटीदरम्यान त्याने त्या उध्वस्त शहरात त्या बिचार्‍या फुजिको होम्माचा पाहुणचार घेतला. त्याच वेळी त्याने होम्माचे नातेवाईक व मित्रमंडळींच्याही गाठीभेटी घेतल्या. त्या गाठीभेटींमुळे त्याची एका नवीन जगाशी ओळख झाली. ही ओळख त्याने बरीच वर्षे पत्रव्यवहाराने जपली.
जसा जसा खटला पुढे जाऊ लागला तसे ज.होम्माचे व्यक्तिमत्व त्याला अधिकच गुंतागुंतीचे वाटू लागले. दुर्दैवाने त्याच्यावर योग्य प्रकाराने खटला चालवण्यात येणार नाही हे पेल्झच्या लक्षात आले. बटानच्या या पशूवर अमेरिकन कायद्याच्या प्रक्रियेने खटला चालवल्यास अनेक अडचणी येऊ शकतात हे त्यांच्या लक्षात आले होते. पण अमेरिकन सेना या अशा अडचणींवर उद्धटपणाने मात करते हे जगात सगळ्यांनाच माहीत आहे. शिवाय होम्माला खलनायक ठरवणेही कठीण होते कारण त्याचा पुर्वेतिहास तसा नव्हता. एकतर तो राजेशाहीच्या/एकाधिकारशाहीच्या विरूद्ध होता. दुर्दैवाने त्याला त्या एकाधिकारशाहीच्या बाजूने युद्ध लढावे लागले व त्यासाठी आपल्या प्राणाची किंमतही मोजावी लागली.
लष्करी परंपरा असलेल्या घराण्यात ज. मासाहारू होम्माचा जन्म झाला. त्याचे वडील एक श्रीमंत जमिनदार होते. तरूण होम्माची प्रगती नेहमीच वादाच्या भोवर्‍यात अडकत असे त्यातच त्याची सूंदर गेशांबरोबरच्या जवळीकीबद्दल त्या काळात अनेक वावड्या उडत असत. लष्करातील अनेक महत्वाच्या पदावर काम करताना त्याने आपल्या कामाची छाप उठवली होती. १९३० साली जपानच्या लष्करी प्रचार खात्याच्या प्रमुखपदी काम करताना त्याच्यातील साहित्यिक गूण उजेडात आले असे म्हणायला हरकत नाही. त्याच काळात त्याने जपानच्या अनेक प्रसिद्ध कवी, लेखक, चित्रकारांशी व नाटककारांशी दोस्ती केली. त्याला एक विचित्र सवय होती. तो ऐन युद्धात कविता करायचा. जपानच्या चौदाव्या आर्मीमधे त्याला “कवी ह्रदयाचा जनरल असेच ओळखत.
तरूण होम्माच्या जवळच्या लोकांना त्याचा स्वभाव त्याच्या व्यवसायाशी विसंगत आहे असे ठामपणे वाटत असे. जपानी भाषेमधे जनरल होम्माचे चरित्र लिहिणार्‍या लेखकाला त्याच्या मित्रांनी होम्माची एक आठवण सांगितली, “ आम्ही त्याच्या बरोबर सिनेमाला जायचे टाळत असू कारण हा एखादा दु:खद प्रसंग सूरू झाला की रडायचा थांबतच नसे.” होम्माच्या मुलाने, मासाहिको होम्माने त्याच्या आठवणीत सांगितले, “एक दिवस आम्ही आमच्या घराभोवती फिरत असताना कुंपणाला एकच अणकुचीदार बांबू राहिला होता. माझ्या वडीलांनी तो ताबडतोब खेचून बाहेर काढला. मी त्याचे कारण विचारल्यावर ते म्हणाले ’इतर बांबूमधे तो किती क्रूर दिसत होता.”
होम्माचा जन्म होंशू किनारपट्टीवरील साडो बेटावर झाला. या बेटावर असंख्य देवळे व मठ आहेत त्यामुळे या शहराचे वातवरण थोडेसे गूढ व परंपरावादी, कर्मठ आहे. हा कर्मठपणा त्यांच्या भाषेतही थोडासा डोकावतो. या गावात जनरल होम्माला अजूनही मोठा मान आहे. असणारच ! कारण हा एकमेव असा जनरल आहे की ज्याने अमेरिकेच्या एका मोठ्या सेनेला हरवून त्याच्या सेनापतीला पळून जायला भाग पाडले होते. हाटानो गावात १८८१ साली बांधलेले होम्मा घराण्याचे घर तेथे एका हिरव्यागार टेकडीवर अजूनही उभे आहे. त्या टेकडीपासून समुद्रापर्यंत पसरलेली हिरवीगार भात शेती परंपरेने होम्माच्या घराण्याकडे चालत आलेली होती. अशा श्रीमंत घराण्यात मासाहारू होम्माचा जन्म झाला होता.
ज्या लेखकाने पेल्झची मुलाखत घेतली होती तो एका पुस्तकासाठी हाटानोला मासाहारू होम्माच्या मुलाला, मासाहिको होम्माला भेटायला गेला होता. हाही त्याच्या वडिलांच्या वळणावर गेला होता. दिसायलाही वडिलांसारखा आणि व्यवसायानेही वडीलांसारखा. १९४३ साली त्याच्या तुकडीला रशियन फौजांनी कुरिल बेटांवर पकडले व सायबेरियाला छावण्यात पाठवून दिले होते. या छावण्यांमधे साठ हजार पेक्षा जास्त जपानी सैनिक मृत्यूमुखी पडले. पाच वर्षे तेथे काढून मासाहिको साडोवर परत आला. आल्यावर त्याला त्याच्या वडिलांची ह्रदयद्रावक हकीकत कळाली. मासाहिकोने ख्रिश्चन धर्म स्विकारला आणि त्याने शाळामास्तरचा व्यवसाय स्विकारला. तो त्याच्या वडिलांबद्दल क्वचितच बोलत असे. त्याच गावात एका शांत जागी जनरल होम्माच्या नावाने एक शिंटो मंदीर बांधण्यात आले आहे. युद्ध संपल्यावर त्याच्या नावाची एक शिळा त्याच्या कुटुंबियांनी तेथे उभी केली व जनरल होम्माचे केस व काही वस्तू ज्या त्याच्या मुलाने फिलिपाईन्समधून मिळवल्या होत्या त्या शिळेखाली पुरण्यात आल्या.
जपानी माणसाची संस्कृती व विचार करायची पद्धत ही जगातील इतर लोकांपेक्षा वेगळी आहे हे दाखवण्यासाठी त्या लेखकाने त्याचा एक अनुभव सांगितला. ( खरे तर हे सगळे सापेक्ष आहे)
तो लेखक लिहितो, “एका दुपारी मी मासाहिकोशी गप्पा मारताना तो म्हणाला, “माझे वडील मला कधीच ओरडले नाहीत. त्या काळात वडिलांनी मारून मुटकून मुलाला शिस्त लावायची हीच पद्धत होती पण माझे वडील मला बेसबॉलच्या मॅचेस बघायला घेऊन जायचे. ते फार प्रेमळ होते. त्यांचा काही गून्हा असेल तर तोच आहे.” त्याच संध्याकाळी आम्ही जेवायला एका अस्सल जपानी रेस्टराँमधे गेलो. या रेस्टराँची खासियत होती साडो पद्धतीने शिजवलेले समुद्रातील शिंपल्यातील मास. (Abolone). जपानी पद्धतीप्रमाणे आम्ही बूट काढून शांतपणे त्या चौरंगावर स्थानापन्न झालो. प्रत्येकाच्या समोर एक छोटा चौरंग होता ज्यावर तो मोठा शिंपला ठेवला होता व त्याच्या खाली गॅसचा एक बर्नर. आम्ही बसल्यावर आमच्या समोर वाकून तेथील वेटरने आमच्या समोरच्या मोत्याप्रमाणे चमकणार्‍या रंगीबेरंगी शिंपल्याखालचे बर्नर चालू केले. थोड्याच वेळात त्या शिंपल्यामधून बारिक आवाज यायला लागले व त्यातील मास शिजायला लागले. दोनच मिनिटांनी त्यातील प्राण्यानी स्वत:चे अंग गुंडाळायला सुरवात केली तेव्हा मला कळाले की शिंपल्यातील तो प्राणी जिवंत आहे. दुसर्‍याच क्षणी तो प्राणी त्या शिंपल्यात आचके देत मरून पडला. तो पर्यंत त्याचा चमचमीत सुवास सगळीकडे पसरला होता. हे सगळे अगदी व्यवस्थीत जपानी शिष्टाचाराने होत होते पण मला तो प्राणी मरताना पाहून कसेसेच झाले. ते बघून माझ्याबरोबर असलेला बौद्ध भिख्खू म्हणाला “हे किती निर्दय वाटते ना ? पण साडोमधे शिंपले खाण्याची दुसरी पद्धतच नाही “………………
जनरल होम्माचा खटला त्या विशेष न्यायालयात ३ जानेवारीला उभा राहिला. हे न्यायालय मॅनिलाच्या हायकमिशनरच्या कार्यालयात भरवले गेले होते. ढासळलेल्या या इमारतीचा पूर्वीचा रूबाब अजूनही शाबूत होता. या खटल्या दरम्यान हे न्यायालय नेहमीच गच्च भरलेले असायचे.
प्रत्येक दिवशी जनरल होम्मा सूट परिधान करून न्यायालयात येत असे व त्याच्या कोटाच्या खिशात पांढरा स्वच्छ रूमाल लावलेला असे. त्याच्या डाव्या बाजूला स्टेनोग्राफर व त्यांच्या मागे जपानी दुभाषे बसत. समोर डग्लस मॅकार्थरने निवडलेले पाच न्यायाधीश बसत. हेच ज्यूरीही असणार होते. प्रमुख न्यायाधीश होता मे. जनरल डोनोव्हन. इतर चारांची नावे होती –ब्रि. ज. ऑर्थर, वारन मॅकनॉट, रॉबर्ट गार्ड व मे. ज. वाल्डेस. ( याच्या भावाचे एका जपानी सैनिकाने डोके उडविले होते)…….
त्यावेळी मॅनिला शहरात जे वातावरण होते त्याचा विचार केल्याखेरीज या न्यायाधिशांच्या मनात काय चालले असेल याचा अंदाज करणे चुकीचे होईल. त्यावेळी फिलिपाईन्समधे जपान विरूद्ध राग धुमसत होता. बटानचा पशू हा शब्द गल्ली बोळातून त्वेषाने उच्चारला जात होता व सूडाची सतत मागणी होत होती. जनरल होम्माला सतत खलनायक म्हणून पुढे आणले जात होते.
पेल्झ व त्याचे सहकारी. पेल्झ उभे असलेल्यांमधे उजवीकडून दुसरा.

या अशा महत्वाच्या माणसाच्या बचावासाठी अमेरिकन सेनेने फारच अनुभवी वकीलांची फौज दिली होती. या वकिलांच्या चमूचा प्रमुख होता कॅप्टन जॅक स्कीन. याचे वय होते २७ आणि याने आजपर्यंत एकाही खटल्यात साधे भाषणही केले नव्हते. जेव्हा त्याला हे कळाले तेव्हा त्याने त्याच्या बायकोला पत्रात लिहिले, “मी आता प्रसिद्ध, गरजेचा व वेडा झालो आहे. अजून काही दिवसांनी मी या धक्क्यातून बाहेर येईन व त्या नालायक माणसाच्या बचावासाठी उभा राहेन”
दुसरा होता कॅप्टन जॉर्ज फरनेस. हा जमिनीचे खटले चालवायचा. तिसरा होता पेल्झ जो सगळ्यात तरूण होता. तो नवखा असला तरी त्याने या खटल्यात त्याच्या पेशाला शोभेल अशी कामगिरी केली असे म्हणावे लागेल………..
जनरल होम्मा….तुरूंगात.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जपानी....कामीकाझे…..

कामीकाझे…..


जपानी माणसाने चार ओळी खरडल्या तरी त्याला एक प्रकारचा गूढ अर्थ प्राप्त होतो हेच खरे. त्यांच्या झेन गोष्टीच बघा किंवा हायकू बघा. मी एक हायकू वाचली होती ती अशी काहीतरी होती. माझा त्याचा अभ्यास नाही पण त्यातील गूढ अर्थ माझ्या चांगला लक्षात राहिला होता…तो असा काहितरी होता…
फासा
चार चेहरे.
प्रयत्न
दु:ख
याचा अर्थ असा आहे की तुम्ही कितीही नियंत्रण करायचा प्रयत्न केला तरी फेकल्यावर फासाच्या एका तरी चेहर्‍यावरचे दान पडतेच आणि मग ते कुठले आहे हे समजून काय करणार…शेवटी दु:खच…. असे काहितरी.

आता ही हायकू बघा..
वसंत ऋतूत ती फुलतात मग विरतात
आयुष्य एखाद्या नाजूक फुलासारखेच आहे
सुगंध त्याचा कसा राहील
कायमचा ?

ही हायकू रचली होती जपानच्या एडमिरल ताकिजिरो ओनिशी याने. याच माणसाने कामिकाझेसाठी वैमानिकांची भरती केली होती. कामिकाझेचा शब्दश: अर्थ “स्वर्गीय वारा” किंवा दुसर्‍या शब्दात सांगायचे तर इश्वरी कृपा. आज आपण कामिकाझेची गोष्ट ऐकणार आहोत. आता कामिकाझे असणे/होणे चूक का बरोबर हे आपण जे झाले त्यांच्यावर सोडू आणि आपल्याला यातून प्रखर देशभक्ती म्हणजे काय हे कळाले तरी मी म्हणतो या लेखाचे काम झाले. ही गोष्ट कमांडर तादाशी नाकाजिमा यांच्या लेखावरून लिहिली आहे.
१९४४ साली फिलिपाईन्समधे माबलाकातच्या जपानी विमानतळावर जपानच्या २०१ एअर ग्रूपचा तळ होता. १९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या उदास सावल्या त्या विमानतळावर पसरत असतानाच एक काळी कुळकुळीत गाडी त्या विमानतळाच्या मुख्यालयासमोर थांबली आणि त्यातून एडमिरल ताकिजिरो ओनिशी बाहेर पडला. जपानच्या १ क्रमांकाच्या स्क्वाड्रन कमांडर असलेला हा अनुभवी हवाईदलाचा अधिकारी, हवाई युद्धाचा तज्ञ म्हणून जगभर प्रसिद्ध होता. त्याने आल्या आल्या सर्व वैमानिकांची आणि त्यांच्या अधिकार्‍यांची बैठक बोलवली आणि फालतू बडबड न करता त्याने मुद्द्याला हात घातला.
“परिस्थिती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. जपानच्या साम्राज्याचे भवितव्य “शो” वर अवलंबून आहे. (फिलिपाईन्स शत्रूच्या ताब्यात परत जाऊ नये म्हणून जी योजना आखली गेली होती तिचे नाव होते ’ऑपरेशन शो’. या पराजयाच्या जवळ आलेल्या काळात या शब्दाचा अर्थ मोठा उपहासपूर्ण वाटत होता. त्याचा अर्थ आहे ’विजय’) एडमिरल कुरिटाच्या अधिपत्याखाली एक नौदल लेतेच्या आखातात आक्रमण करून तेथील शत्रूला कंठस्नान घालणार आहे. यासाठी या पाण्यात शत्रूच्या बोटींना मज्जाव करायची कामगिरी १-स्क्वाड्रनवर सोपवण्यात आली आहे. कमीत कमी एक आठवडा आपल्याला हे संरक्षण पुरवायचे आहे. पण पारंपारीक युद्ध करून शत्रूच्या या बोटी बुडवणे आपल्याला शक्य नाही. माझ्या मते शत्रूची ही विमानवाहू जहाजे जर त्यांच्या धावपट्टीवर आपल्या विमानांनी धडक मारून ती उध्वस्त केली तरच हे शक्य आहे. यासाठी आपली झिरो फायटर विमाने उपयोगी पडतील. त्यात २५० किलो स्फोटके सहज जाऊ शकतात”
त्यांना काय करायचे होते त्याचे चित्र. अर्थात हे खरे आहे.

ते ऐकून, एकणार्‍यांच्यात विरश्री संचारली. त्याच्या या भाषणाचा अर्थ न कळण्याइतके ते दुधखुळे नव्हते. तो त्यांना त्याच्या आत्मघातकीपथकात सामील व्हा असे आवाहन करायला आला होता. त्याचे भाषण संपल्यावर २०१- एअर ग्रूपच्या कमांडर तामाईने त्याच्या स्क्वाड्रन लिडर्सशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितला. हे ऐकल्यावर त्याचे बहुतेक करून सर्व वैमानिक या आत्महत्येला तयार होतील अशी त्याला खात्री होती. “ते सर्व जण चुपचाप होते पण त्यांचे डोळे बोलत होते. व जे अनेक वाक्यात सांगता येणार नाही ते एका नजरेत सांगत होते ’हो आम्ही जाणार’”. कमांडर तामाईने नंतर त्याच्या आठवणीत सांगितले आहे. फक्त दोघांनी या कामगिरीसाठी नकार दिला.
या पहिल्या हल्ल्याचे नेतृत्व लेफ्टनंट युकिओ सेकी करणार होता, हा एक बुद्धिमान, अत्यंत प्रामाणिक असा अधिकारी होता आणि त्याने त्याचे प्रशिक्षण जपानच्या इता जिमा नॅव्हल एकॅडमीमधून पूर्ण केले होते. जेव्हा कमांडर तमाईने सेकीला मोहिमेबद्दल सांगितले तेव्हा त्याने समोरच्या टेबलावर आपले दोन्ही कोपरे टेकले. हाताच्या पंजांनी आपल्या हनुवटीला आधार दिला आणि डोळे बंद केले.
या तरूण अधिकार्‍याचे नुकतेच लग्न झाले होते. त्याच्या डोळ्यासमोर त्याची सुंदर पत्नी व स्वप्ने तरळली. दोन सेकंदानंतर त्याने डोळे उघडले, मान वर करत तो म्हणाला “ठीक आहे मी हे नेतृत्व स्विकारतो”.
२० ऑक्टोबरला सूर्योदय झाल्यावर एडमिरल ओनिशी याने कामगिरीवर जाणार्‍या २४ कामिकाझेंना बोलवले आणि त्यांना त्यांची कामगिरी समजाऊन सांगितली. ती सांगतांना त्याच्या सारख्या कसलेल्या व युद्धात ताऊन सुलाखुन निघालेल्या कमांडरचाही आवाजातला कंप जाणवत होता.
“जपान एका अत्यंत भीषण आपत्तीला सामोरे जात आहे. या आपत्तीतून बाहेर पडणे हे आपले राजे, त्यांचे मंत्रीमंडळ आणि माझ्या सारख्या कनिष्ट दर्जाच्या अधिकार्‍यांच्या शक्तिबाहेरचे आहे. आता जपानचे भवितव्य तुमच्या सारख्या तरूणांच्या हातात आहे” त्याच्या डोळ्यातून अश्रूंचे दोन थेंब ओघळले ते त्याने लपविले नाहीत. (ही एक अशक्य कोटीतील गोष्ट मानली जाते) “जपानसाठी जे काही करता येईल ते करा त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो”.

इतर विमानतळावरही कामिकाझेसाठी याच प्रकारची भरती चालली होती. सेबूच्या विमानतळावर २० ऑक्टोबरला संध्याकाळी ६ वाजता सगळ्यांना एका सभागृहात जमविण्यात आले. त्यांना संबोधीत करत कमांडर म्हणाला
“या विशेष कृतीदलात ज्याला भाग घ्यायचा आहे त्याने एका कागदावर आपले पद व नाव लिहून तो कागद एका लिफाप्यात घालून, ते बंद करून माझ्याकडे द्यायचे आहे. ज्याला जायचे नाही त्याने कोरा कागद लिफाप्यात घालावा. तुम्हाला विचार करायला तीन तास देण्यात येत आहेत”.

रात्री ९ वाजता एका वरीष्ठ आधिकार्‍याने एक पाकीट कमांडरच्या घरी पोहोचते केले. आतल्या कागदांमधे फक्त दोन कोरे होते.
२५ ऑक्टोबरला कामिकाझे तुकडीने आपला पहिला यशस्वी हल्ला केला. सहा विमानांनी पहाटे दवाओ विमानतळावरून उड्डाण केले आणि ती लगेचच शत्रूच्या तीन विमानवाहू नौकांवर जाऊन आदळली. ही तिन्हीही जहाजे निकामी झाली.
त्याच दिवशी सकाली ले. सेकीने माबलकात विमानतळावरून आपल्या सहकार्‍याबरोबर उड्डाण केले. त्यांना मार्ग दाखवणार्‍या एका विमानाच्या वैमानिकाने त्यावेळेचा वृत्तांत लिहिताना म्हटले “शत्रूच्या चार विमानवाहू नौका व इतर सहा नौका दिसल्यावर ले. सेकीने सुर मारला व तो एका विमानवाहू नौकेवर जाऊन आदळला. दुसरे एक विमान त्याच नौकेवर आदळले आणि त्या नौकेतून धुराचे मोठे लोट निघू लागले. अजून दोन वैमानिकांनी आपले लक्ष अचूकपणे टिपले.”


कामिकाझेच्या यशाची बातमी जपानच्या नौदलात झपाट्याने पसरली. त्या अगोदर जपानने याच नौकांवर ९३ लढाऊ विमाने आणि ५७ बाँबफेकी विमानांच्या सहाय्याने हल्ला चढवला होता पण त्याने शत्रूचे काहीच नुकसान झाले नव्हते. या पार्श्वभुमीवर कामेकाझेच्चे यश फारच उठून दिसत होते.
एडमिरल ओनिशीची आता खात्री पटली होती की हे मानवी टॉरपेडोच आता कामास येणार आहेत. त्याने २-एअर प्लिटच्या व्हाईस एडमिरल फुकुदोमेला या बाबतीत पटवले. “ याखेरीज आपल्याला दुसरा मार्ग नाही. तुझ्याही फ्लिटने हा मार्ग अनुसारायची वेळ आता आलेली आहे.”
अशा रितीने कामिकाझेचा मार्ग मोकळा झाला आणि तरूण वैमानिक या त्यागासाठी मोठ्या अहमहमिकेने या स्वर्गीय वार्‍यावर स्वार होण्यासाठी नावे नोंदवू लागली. जपानच्या मुख्य भुमीवरूनही कामिकाझेमधे सामील होण्यासाठी अनेक तरूण पुढे सरसावले व बोलावणे यायची वाट पाहू लागले…………..
क्रमश:
जयंत कुलकर्णी

हिटलरचे शेवटचे १० दिवस……


हिटलरचे शेवटचे १० दिवस……

हिटलरचे शेवटचे १० दिवस……
बरोबर ६७ वर्षापूर्वी.
बंकरच्या बाहेर-

नाझी जर्मनीच्या पाडावानंतर तीनच आठवड्याने रशियन पोलिसदलाचा प्रमुख मेजर इव्हान निकितीन याने बर्लिनहून अहवाल पाठवला की फ्युररने स्वत:ला गोळी वैगरे काही घालून घेतलेली नाही ना त्याच्या प्रेताचे तेथे कुठे दफन झाले आहे. पण तशी अफवा मात्र जरूर होती. तो मृत्यू पावला आहे की नाही याचीच शंका आहे. हिटलर जिवंत आहे या अफवेची ही सुरवात होती.
या अफवा अशाच पसरत राहिल्याने दोस्त राष्ट्रांच्या गुप्तहेर खात्याने १९४५ साली या बाबतील सखोल चौकशी करायचा आदेश दिला आणि हळूहळू त्या काळात काय काय झाले होते याची कहाणी उभी राहिली. जी २८ माणसे हिटलरबरोबर त्याच्या बंकरमधे रहात होती त्यांना नंतर पकडण्यात आले आणि त्यांना वेगवेगळ्या खोल्यात ठेवून प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी दिलेल्या उत्तरांचा प्रत्येक उत्तराशी व बाहेरच्या माहितीचा ताळमेळ घालण्यात आला. या सगळ्यातून हिटलरच्या अखेरच्या दिवसांचे एक स्पष्ट चित्र उभे राहिले. पण तसे हे अपूर्णच म्हणायला हवे कारण त्याच्या मनात काय चालले होते हे कोणीच सांगू शकत नव्हते…… ते हे अपूर्ण चित्र.

१९४५च्या ३० एप्रीलच्या दुपारी २.३० वाजता हिटलर त्याच्या पत्नीबरोबर फ्युररबंकरमधे बसला होता. त्याच वेळी त्याने आपल्या स्वयंचलीत वाल्थरची नळी आपल्या तोंडात घातली आणि त्याचा चाप ओढला व त्याच वेळी त्याची पत्नी इव्हा हिटलरने आपल्या दाताखाली सायनाईडची कॅपसूल चावली. रात्री १०.३० वाजता जनरल राटेनहबर आणि त्याच्या विश्वासू सैनिकांच्या तुकडीने ती दोन प्रेते अनेक वेळा पेट्रोलमधे भिजवली. त्याला आग लावल्यावर जे काही अवशेष उरले ते त्यांनी पुरून टाकले. रात्रभर रशियन तोफा गडगडत होत्या आणि त्यांच्या मार्‍यात १००० वर्षाचे आयुष्य असणार्‍या राईशस्टाग आणि ती वल्गना करणार्‍या हिटलरच्या थडग्याच्या (?) चिंधड्या ऊडत होत्या.
हिटलरच्या जन्मदिवसालाच म्हणजे २० एप्रिललाच त्याच्या शेवटास सुरवात झाली होती. त्या दिवशी चॅन्सेलरी गार्डनच्या ५० फूट खाली असलेल्या बंकरमधे जर्मन सैन्यातील वरीष्ठ अधिकारी तेथे त्यांच्या सुप्रीम कमांडरचे अभिष्टचिंतन करण्यास जमले होते. सगळ्यांचे गणवेष, पदके व बूट चकाकत होते पण ती चकाकी त्यांच्या चेहर्‍यावरून परावर्तीत होत नव्हती. ते ओढलेले आणि तणावग्रस्त दिसत होते. साहजिकच आहे. सर्व आघाड्यांवरून जर्मन फौजेच्या माघारीच्या बातम्या येत होत्या. रशियन फौजा बर्लिनची दारे ठोठावत होत्या तर एल्ब नदी पार करून त्यांच्याशी हातमिळवणी करायला ब्रिटन, फ्रान्स व अमेरिकेचे सैन्य मोठ्या तडफेने निघाले होते.
दहा महिन्यापूर्वी त्याच्या हत्येच्या कटाच्या वेळी झालेल्या स्फोटातून सहीसलामत वाचल्यावर त्याच्या व्यक्तिमत्वात बराच बदल झाला होता. तो आता एक पाय ओढत, पाठीत वाकून चाले आणि त्याच्या डाव्याहातातील कंप थांबविण्यासाठी तो डावा हात उजव्या हाताने दाबून धरत असे. पण त्याच्या आवाजाती जरब आणि नाट्य तेच होते व डोळ्यात तीच पूर्वीची चमक.
त्याच दिवशी जालेल्या बैठकीत फिल्ड मार्शल कायटेलने हिटलरला बिकट वस्तुस्थितीची पूर्ण कल्पना दिल्यावर हिटलरने जे उत्तर दिले त्यावर जमलेल्यांचा विश्वास बसेना. हिटलरने कायटेलला बाजूला सारले आणि तो म्हणाला “मूर्खपणा ! रशियाला बर्लिनच्याबाहेर आता एका रक्तरंजीत युद्धाला सामोरे जावे लागेल ज्याच्यात त्यांचा दारूण पराभव निश्चित आहे. त्यानंतर आपण दोस्तांच्या सैन्याला समुद्रापर्यंत मागे ढकलू”.
त्याच्या डोळ्यात आता वेगळीच चमक दिसत होती. सगळीकडे शांतता पसरली आणि कोणाच्या तोंडातून शब्द फुटेना.
राईश मार्शल हर्मन गोअरींगने पसरलेल्या भयाण शांततेचा भंग करत म्हटले “विजय शेवटी जर्मनीचाच होणार आहे पण आमचे एवढेच म्हणणे आहे की फ्युररने बर्लिन सोडून एखाद्या सुरक्षित जागी जावे आणि तेथून आपल्या सेनेचे संचलन करावे”.
हिटलरने त्याच्याकडे भेदक नजर टाकली. “ याचा अर्थ तुला एखाद्या सुरक्षित जागी जायचे आहे एवढाच आहे. तू जाऊ शकतोस”. गोअरींगने त्याचा राईश मार्शलचा बॅटन खाकेत धरला आणि त्याला एक सॅल्युट ठोकला व तेथून घाईघाईने बाहेर पडला. जाताना ट्रक भरून त्याच्या मौल्यवान वस्तू आणि मर्सडिस घेतली आणि बव्हेरीयाच्या दिशेने त्याने कूच केले. जणू काही बव्हेरियात गेल्यावर त्याची सुटका होणार होती.
गोअरींग गेल्यावर हिटलर परत त्याच्या नकाशांकडे वळाला आणि त्याचे नवीन डावपेच समजावून सांगायला लागला. त्या आठवणी सांगत असताना एक जनरल म्हणाला “ सैन्याच्या ज्या डिव्हिजन्स घेऊन तो हे नवीन डावपेच आखत होता त्या अस्तित्वात नाहीत हे आम्हाला चांगलेच ठाऊक होते पण त्याचे बोलताना एकताना आम्हाला असे वाटत होते की अजूनही काहीतरी होईल आणि आम्ही परत लढाईत उतरू शकू.”
त्या दिवशी तेथे जमलेल्या माणसांमधे एकच माणूस असा होता जो भ्रमिष्ट हिटलरच्या प्रभावाखाली नव्हता. त्याला जर्मन जनतेची काळजी लागली होती आणि तो म्हणजे अल्बर्ट स्पीअर. याच माणसाने युद्धसामग्रीचे अनाकलनीय उत्पादन करून हिटलरच्या युद्धाचा गाडा चालू ठेवला होता. पराभव झाल्यास हिटलरने त्याचे राइश नष्ट करायची एक योजना आखली होती व मार्च मधेच त्याला हिटलरच्या या भयानक योजनेचा पत्ता लागला होता. सर्व जिल्ह्याच्या नाझी प्रमुखांना त्याच्या हद्दीतील सर्व कारखाने, महत्वाच्या इमारती, खाणी, अन्नाचे साठे इ. नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते. लष्कराला सर्व नदीवरील सर्व पूल, रेल्वे, कालवे, जहाजे इ. उध्वस्त करायचे आदेशही देण्यात आले होते. अल्बर्ट स्पिअरने सर्व जर्मनीत वादळी दौरे करून त्या सर्व प्रमुखांना हा आदेश पाळणे जर्मनीच्या हिताचे कसे नाही हे समजावून सांगितले. हिटलरच्या वाढदिवसाला हा आदेश परत घ्यायची विनंती करून जर्मनीला वाचवायचा प्रयत्न करायचा ठरवले पण ती विनंती ऐकल्यावर हिटलरने शुन्यात नजर लावली आणि म्हणाला “जर जर्मन नागरिकांनी शरणागती पत्करली तर त्यांची तीच लायकी आहे हे सिद्ध होईल. तसे झाले तर त्यांचा नाश व्हायलाच पाहिजे.”
हे उत्तर ऐकल्याव्र स्पीअरने स्वत:च्या जिवाची काळजी न करता करून हिटलरच्या या योजनेला सुरूंग लावायचा ठरवला. गेस्टापोंची त्याच्यावर नजर असतानाही त्याने परत जर्मनीभर दौरे आखले व सर्व प्रांत प्रमुखांना भेटून त्यांना हिटलरच्या या आज्ञा पाळू नयेत अशी आवाहने केली. कार्ल कौफमनने त्याला महत्वाची बंदरे नष्ट करण्यात येणार नाहीत असे आश्वासन दिले. बाकीच्यांनीही घाबरत का होईना याला मंजूरी दिली.
हिटलरच्या कडव्या दुराग्रही पाठिराख्यांच्या हातात त्याच्या ताब्यातील कारखान्यातील दारूगोळा पडू नये म्हणून तो विहिरींमधे आणि पाण्याने भरलेल्या खाणींमधे टाकून द्यायचे त्याने आदेश दिले. त्याच्या या आदेशामुळे अनेक प्राण वाचले असे म्हणायला हरकत नाही.
दरम्यानच्या काळात हिटलरने रशियन फौजांना बर्लिनच्या बाहेर फेकण्याच्या योजना बारीकसारीक तपशिलासह तयार केल्या होत्या. हे रशियन सेनेवरचे आक्रमण एस.एस चा जनरल फेलिक्स स्टाईना याच्या अधिपत्याखाली करण्यात येणार होते. त्याच्याशी टेलिफोनवर बोलताना हिटलर जवळजवळ किंचाळलाच “जो अधिकारी आपला एखादाही सैनिक या आक्रमणात मागे ठेवेल त्याला पाच तासात ठार केले जाईल”.
२२ एप्रिलच्या दुपारी हिटलरने त्या बंकरमधे स्टाईनाच्या पहिल्या विजयाची घोषणा केली. एस.एस.चा विकृत मनोवृत्तीचा प्रमुख हिमलरने टेलिफोनवरून बातमी दिली की स्टाईनाची फौज मोठ्या शौर्याने लढत आहे आणि रशियन फौजा बर्लिनमधून मागे हटत आहेत. पण त्याचवेळी कर्नल जनरल अल्फ्रेड जोडलच्या टेबलावर अनेक संदेश येऊन पडत होते. ते बघितल्यावर त्याची वाचाच बसली. त्याला काय करावे ते कळेना. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. तो बघून हिटलरने त्याला विचारले “काय झाले ?”
“फ़्युरर, स्टाईनाने हल्ला केलेलाच नाही. मार्शल झुकॉव्हचे रणगाडे बर्लिनमधे घुसलेत”.
हिटलरने समोर बघितले आणि त्याचा चेहरा काळानिळा पडला. “एस.एस. ! माझा विश्वासघात एस.एस. ने केला. पहिल्यांदा लष्कराने, मग लुप्फ़्तवाफने आणि आता तुम्ही….विश्वासघातकी सगळे.. ….” तीन तास हिटलर रागाने गुरगुरत होता, येरझार्‍या घालत होता. अखेरीस निराश होत त्याने एका खुर्चीत आपले अंग टाकले. “तिसरे राईश संपले ! संपले !” तो पुटपुटला. “आता माझ्यापुढे मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नाही. मी येथेच थांबणार आहे आणि शेवटी मी आत्महत्या करेन. लढाई करायची असेल तर करणार तरी कशाने… गोअरींगला सांगा…तहाची बोलणी सुरू करायला…..”
हिटलरचे हे शब्द गोअरींगला सांगण्यात आले. १९४१ साली झालेल्या कायद्याने त्याला हिटलरचा वारस नेमण्याची तरदूत झाली होतीच. त्याला दोस्तराष्ट्रांबरोबर तहाच्या वाटाघाटी करायचा आत्मविश्वास होता आणि कमीत कमी त्याच्या स्वत:च्या सुटकेचे तरी प्रयत्न करता येतील या विचाराने त्याने हिटलरला रेडिओवर संदेश पाठवला – आपण घेतलेल्या निर्णयानुसार मी राईशचे नेतृत्व स्विकारावे हे आपल्याला मान्य आहे का ? मला जर आज रात्री १० पर्यंत आपले उत्तर आले नाही तर मी या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी समजेन. – गोअरींग”
हा संदेश पाठवून गोअरींगने आपल्या शरीररक्षकांची संख्या १००० केली आणि तो जनरल आयसेनहॉव्हर यांना भेटायच्या तयारीला लागला. त्याने आयसेनहॉव्हरला संदेश पाठवण्यासाठी तो लिहायला घेतला तेवढ्यात हिटलरचा संदेश येऊन धडकला.-
तू जे केले आहेस त्यासाठी खरे तर तुला मृत्यूदंडच द्यायला पाहिजे. पण तू राजिनामा दिलास तर मी या शिक्षेचा आग्रह धरणार नाही. नाही दिलास तर मला पुढील कार्यवाही करावी लागेल. – हिटलर”.
अविश्वासाने या कागदाकडे गोअरींग टक लाऊन बघत असतानाच बुटांचा खाडखाड आवाज झाला आणि काही एस.एस.चे जवान आत आले आणि त्यांनी गोअरींगला अटक केली. हिटलरला खरे तर वारस नकोच होता.
गोअरींग हिटलरच्या बंकरमधून बाहेर पडल्यापडल्या तासाच्या आतच हिटलरने त्याची चिता रचायची योजना मोठ्या काळजीपूर्वक आखायला चालू केले. शांतपणे आणि विचार करून त्याने अमेरिकेच्या सैन्याबरोबर लढणार्‍या जनरल वेंक्सच्या १२व्या आर्मीला बर्लिनला माघारी बोलावले. बर्लिनमधील प्रत्येक माणसाला व मुलाला रशियाच्या सेनेला थांबवण्याच्या लढाईत सामील व्हायच्या आज्ञा देण्यात आल्या. जे टाळतील त्यांना जागेवरच फासावर चढवण्यात येणार होते.
हा आदेश मिळाल्यावर नाझी पार्टीचा एक जेष्ठ पुढारी वेगेना याने हिटलरला फोन करून त्याला समजवण्याचा प्रयत्न केला “ पश्चिमेला जर अमेरिकन आणि ब्रिटनच्या सैन्यासमोर ताबडतोब शरणागती पत्करली तर रशियन सेनेला थोपवता येईल आणि बराच विध्वंस टाळता येईल” हे ऐकल्यावर हिटलर म्हणाला “ विध्वंस ! मला आता तोच पाहिजे आहे. त्या विध्वंसानेच माझा पराभव उजळून निघेल”. दुसर्‍याच दिवशी २५ एप्रिलला रशियन सैन्याने बर्लिनला वेढा घातला.
गेल्या सात दिवसात बंकरमधे
हिटलरच्या भोवती असलेल्या त्याच्या सहकार्यांमची संख्या हळुहळु कमी होत चालली होती. गोबेल्स आणि त्याच्या बायकोने त्यांची सहा मुले आता बरोबर आणली होती. या मुलांना त्याने स्वत: आत्महत्या करायच्या अगोदर ठार मारले हे आपल्याला माहीत आहेच. (पण या मुलांना ठार मारल्यानंतर ती बाई शांतपणे पत्ते खेळत होती हे कदाचित माहिती नसेल)
गोबेल्स कुटुंब -

हिटलरचा आजवरच्या वाटचालीतील साथीदार मार्टीन बोरमन याने तेथेच रहायचा निर्णय घेतला. ईव्हा ब्राऊनने तेथून जायला नकार दिला. हिटलरच्या खोलीच्या शेजारी असलेल्या या मोठ्या खोलीत २६ वरीष्ठ सेना अधिकारी आणि इतर जण होते.
जसे जसे रशियनसैन्याच्या तोफांचा आवाज एकू यायला लागला तसे तसे बंकरमधील वातावरण बदलू लागले. थोड्याच वेळात त्या तोफांच्या गोळ्यांनी तो बंकर हादरायला लागला तसे ते फारच बदलून गेले. सगळ्यांच्या मनावरील ताबा सुटला व दारू पाण्यासारखी वाहू लागली. शिस्तीचा बाऊ करणारे प्रशियन सेनानी आपले कपडे काढून सेक्रेटरींबरोबर बेफाम नृत्य करू लागले, कोणालाच कसले भान उरले नाही.
इकडे हिटलर मात्र भ्रमिष्टासारखा नकाशासमोर उभा राहून बैठका बोलवत होता. कोणी हजर रहात होते, तर कोणी हजर रहात नव्हते. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की रशियन सैन्य बर्लिनच्या एका ट्युब रेल्वेच्या मार्गातून त्याच्या बंकरपर्यंत विनाविलंब येऊ शकते. त्याने लगेचच तो मार्ग पाण्याने भरून टाकायचा आदेश दिला. ज्याला हा आदेश दिला तो जनरल क्रेबने नापसंती दर्शवत सांगितले की तसे करणे शक्य नाही कारण त्यात हजारो जखमी जर्मन सैनिक लपलेले आहेत. हिटलरने त्याचे वाक्य तोडत आज्ञा केली “मी सांगतो तसे करा.” थोड्याच वेळात ती आज्ञा पाळण्यात आली.
२८ एप्रिलला स्टॉकहोमच्या वार्ताहराच्या एका प्रेस रिपोर्टवरून एक वाईट बातमी कळाली ती म्हणजे हिटलरचा सगळ्यात जास्त विश्वास ज्याच्यावर होता तो एस.एस.चा प्रमुख हाईनरिश हिमलर काऊंट बेनाडोट याच्या बरोबर जर्मनीच्या शरणागतीच्या वाटाघाटी करतोय. हा मात्र न पचणारा धक्का होता. ते ऐकल्यावर हिटलर किंचाळला “उंड येट्झ ड ट्वाय हाईनरिश” म्हणजे आता माझा विश्वासू हाईनरीशही !” पण त्याचा हा शेवटचा आक्रस्तळेपणा फार थोड्यावेळ टिकला. तो एकदम शांत झाला. बहुतेक त्याला आता काय झाले आहे आणि काय होणार आहे हे कळाले असावे. हा शेवट होता !
त्या बंकरमधील शेवटचे दोन दिवस तर सगळ्यात विचित्र होते असे म्हणायला हरकत नाही. २९ एप्रिलला चॅन्सेलरीवर पडणार्या बाँबच्या साक्षीने एका साध्या सुटसुटीत समारंभात हिटलरचे आणि इव्हा ब्राऊनचे लग्न झाले.
इव्हा ब्राऊ -

त्यानंतर हिटलरने त्याच्या चिटणीसाला त्याच्या शेवटचे राजकीय मृत्यूपत्र लिहायला सांगितले अर्थात त्यात त्याने आत्तापर्यंत जे म्हटले होते त्याचीच पुनरावृत्ती होती. त्यात गोअरींग आणि हिमलरला नाझी पक्षातून काढून टाकण्यात आलेले आहे अशीही नोंद त्याने मुद्दामहून करायला लावली आणि एडमिरल डॉनिट्झला त्याने आपला उत्तराधिकारी नेमले. त्यानंतर त्याने एका वर्तमानपत्रातून ( ही त्याच्याकडे नियमीत आणली जात ) मुसोलिनीच्या मृत्यूची व त्याच्या आणि क्लाराच्या प्रेतांच्या विटंबनेची बातमी सविस्तर वाचून दाखवली. हिटलरने अगोदरच आज्ञा केली होती की आत्महत्येनंतर त्यांची प्रेते पूर्णपणे नष्ट करण्यात यावीत पण आता त्याने ती आज्ञा परत परत वाचून दाखवली.
दुपारी नेहमीप्रमाणे त्याने रशियन फौजांच्या आक्रमणाचा आढावा घेतला. १ मेला चॅन्सेलरीवर हल्ला होईल असा अंदाज बांधण्यात आला.
“मग आपल्याकडे फार वेळ नाही. मला त्यांच्या हातात जिवंतपणी पडायचे नाही. काय वाट्टेल ते होऊ देत !”
त्याच रात्री उशीरा त्याच्या नोकराने सगळ्यांना मुख्य बंकरमधे बोलावले. हिटलरला सगळ्यांचा निरोप घ्यायचा होता. सगळे जमल्यावर हिटलरने शांतपणे प्रत्येकाशी हस्तांदोलन कारून प्रत्येकाचा निरोप घेतला. उपस्थित असलेल्या एका माणसाने नंतर आठवणीत सांगितले “ त्याच्या नजरेत वेगळेच भाव होते. मला वाटले तो आमच्यातून तेव्हाच निघून गेला होता”
इकडे स्टाफ कॅंटीनमधे हलकल्लोळ माजला होता. कोणीतरी दारूची एक बाटली घेतली. टेबलावर उडी मारून त्याने ती तोंडाला लावली व तो ओरडला “मृतांच्या आत्म्यास शांती लाभो” अजून कोणीतरी ग्रामोफोन चालू केला. मग त्यावर लावलेल्या गाण्याच्या तालावर नाचगाणी आणि गोंधळ पहाटेपर्यंत चालूच होता. कोणीतरी हिटलरने हे सगळे थांबवायला सांगितले आहे आहे असा निरोप आणला पण त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याच्या आज्ञा ऐकण्याच्या मनस्थितीत कोणीच नव्हते.
३० एप्रिलला बरोबर दोन वाजता हिटलरने नेहमीप्रमाणे दुपारचे जेवण घेतले. त्याचा चेहरा पांढराफटक पडला होता पण त्याने चवीने जेवण केले. जेवणानंतर तो आणि ईव्हा त्या बंकरच्या हॉलमधे गेले. इव्हाने पांढर्‍या रंगाच्या स्कर्टवर गडद निळ्या रंगाचा कोट घातला होता. तेथे त्याचे आजवरचे साथीदार – बोरमन, गोबेल्स इ.. त्याची वाट बघत थांबले होते. त्या सगळ्यांनी एकामेकांचा न बोलता निरोप घेतला आणि ते आपापल्या खोल्यांमधे परतले.
हिटलरच्या खोलीचा दरवाजाचा बंद झाला आणि एका सैनिकाने त्या दरवाजासमोर जागा घेतली. काहीच क्षणात गोळी झाडल्याचा आवाज झाला आणि सगळा खेळ संपला.
जे राईश हजार वर्षे टिकणार होते ते त्या क्षणी नष्ट झाले…………..
उध्वस्त फ्युररबंकर -

जयंत कुलकर्णी.