Latest Post
अजंठा गुंफा: भाग 3
सातवाहन कालातील म्हणता येतील अशी 3 भित्तीचित्रे अजंठ्याच्या 10 क्रमांकाच्या गंफेत आहेत आणि ती अतिशय विद्रूप व खराब अवस्थेत असल्याने कॅमेर्याच्या सहाय्याने, झूम करून सुद्धा, त्यावरून तत्कालीन काहीही माहिती प्राप्त करण्याची सुतराम शक्यता नाही हे आपण आधी बघितले आहे. या मूळ 3 चित्रांवरून, ग्रिफिथ यांनी काढलेल्या चित्रांपैकी काही त्यांनी आपल्या पुस्तकात प्रसिद्ध केली होती. … Continue reading
अक्षरधूळ शो केस
अजंठा घळीतील गुंफांमध्ये, “पूर्वकालीन गुंफा” या नावाने ओळखला जाणारा गुंफांचा गट आहे. या गटात 6 गुंफा असून त्या इ.स.पूर्व 200ते100 या किंवा सातवाहन राजे, सिमुक, कृष्ण व श्री सातकर्णी हे राज्यावर असण्याच्या कालखंडात खोदल्या गेलेल्या आहेत. या गुंफांना 8, 9, 10, 12, 13, आणि 15अ असे क्रमांक दिले गेले आहेत. या गटापैकी क्रमांक 13, व … Continue reading
शुएन त्झांग या अत्यंत विद्वान बौद्ध भिख्खूने, इ. स, 629, या वर्षी, मूळ स्वरूपातल्या बौद्ध धर्मग्रंथाचे अध्ययन व प्राप्ती हे दोन्ही हेतू मनात ठेवून, भारतात येण्याच्या आपल्या पायी प्रवासाला चीनमधून प्रारंभ केला हा इतिहासाचा भाग आपल्यापैकी बहुतेकांना माहिती आहेच. आपल्या सुदैवाने शुएन त्झांग याने आपल्या प्रवासाचे अतिशय सूक्ष्म दृष्टीने केलेले वर्णन लिहून ठेवले आहे व … Continue reading
पितळखोर्यामधील 4क्रमांकाच्या विहारातून परत बाहेर आल्यानंतर समोर पडलेल्या पाषाण खंडांकडे मी बघत असतानाच, माझ्या बरोबर असलेला पुरातत्त्व विभागाचा अधिकारी, गुंफेच्या मुखाच्या बर्याच वर, म्हणजे मी उभा आहे त्या स्थानापासून निदान 90 ते 100 फूट तरी ऊंचीवर, असलेल्या समोरच्या पाषाण कड्याकडे माझे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रथम नीटसे दिसत नाही. परंतु नंतर लक्षात येते की … Continue reading
नसते वाद विवाद उकरून काढण्यात भारतातील मंडळी जशी वाकबगार आहेत तशी बहुदा दुसर्या कोणत्याही देशातील नसतील. खाप पंचायत ह्या उत्तर भारतातल्या एका जुन्या समाज व्यवस्थेने आता सगोत्र विवाहाचा वाद असाच उपस्थित केला आहे. ही खाप पंचायत तशी अनेक वर्षे अस्तित्वात आहे आणि किरकोळ तंटे मिटवण्यासाठी उपयुक्त असल्याने ब्रिटिश व नंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत सरकारने तशीच … Continue reading
आणखी थोडे काही
- बेंगलुरू शहरामध्ये, केंद्र सरकारच्या 'आधार' कार्डासंबंधीच्या संगणक कार्यप्रणाली विकसित करण्यासाठी एक कार्यालय आहे. तुषार आणि मॅट हे या कार्यालयात काम करणारे दोन तरूण. नोकरी लागल्यावर एकच सदनिका शेअर करण्याचे त्यांनी ठरवले व एकत्र रहायला लागल्यानंतर दोघांची चांगलीच मैत्री जुळली. दोघांचे पूर्वायुष्य तसे साधारण एकाच चाकोरीतून गेलेले! तुषार हा हरयाणामधील एका पोलिस अधिकार्याचा मुलगा! भारतातील शिक्षण पूर्ण झाल्यावर अमेरिकेतील पेनसिल्व्हानिया विद्यापीठातून पदवीधर झाल्यावर इनव्हेस्टमेंट बॅन्कर म्हणून 3 वर्षे अमेरिका व सिंगापूरला काम केलेला! मॅट हा आपल्या आईवडिलांबरोबर लहान वयातच अमेरिकेला स्थायिक झाला. अमेरिकेतील एम आय टी सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून त्याने शिक्षण घेतले. या दोन्ही तरूणांच्या मनाने घेतले की आपण भारतात परत जावे म्हणजे आपल्या देशाला आपला काहीतरी उपयोग होईल. त्याप्रमाणे ते परत आले व त्यांनी बेंगलुरूमध्ये ही नोकरी घेतली. (आणखी...)
- सीबीआय ही सर्व प्रकारच्या गैरव्यवहारांची चौकशी करणारी भारतातली सर्वात श्रेष्ठ दर्जाची यंत्रणा मानली जाते. या सीबीआयचे महासंचालक श्री. ए.पी.सिंग हे गृहस्थ आहेत. आंतर्राष्ट्रीय पोलिस संघटना किंवा इंटरपोलने नुकताच " भ्रष्टाचार टाळण्यासाठी व अवैध रित्या जमा केलेला पैसा उघड करण्यासाठी इंटरपोलचा जागतिक कार्यक्रम " ( Interpol global programme on anti-corruption and asset recovery ) हातात घेतला आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या कॉन्फरन्सच्या उदघाटन प्रसंगी या सदगृहस्थांनी तुम्हाला आम्हाला माहिती असलेली एक गोष्ट परत सांगितली. मात्र त्यांनी या बाबत जी काही डिटेल्स दिली ती मोठी रोचक आहेत. (आणखी...)
- मला आठवते की मागच्या वर्षी कधीतरी एक बातमी मी वृत्तपत्रांतून वाचली होती. कर्नाटकच्या सर्व आमदारांना स्मार्टफोन देण्यात येणार म्हणून!. त्या वेळेस मला थोडे आश्चर्यही वाटले होते की ही मंडळी हे स्मार्टफोन घेऊन काय करणार? पण राज्यासमोर असलेल्या निरनिराळ्या प्रश्नांची माहिती करून घेता यावी. त्यांच्या मतदारसंघांतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, शेती उत्पादन या सारख्या संख्या लक्षात ठेवता याव्या व मूलभूत स्वरूपाची माहिती स्वत:जवळ ठेवण्यासाठी हे स्मार्टफोन दिले गेले असल्याची माहिती या बातमीत दिलेली होती. पण 2 दिवसापूर्वी कर्नाटक विधानसभेत, सत्र चालू असताना, लक्ष्मण सावेदी, सी.सी.पाटील व जे. कृष्णा पालेमार हे तीन मंत्री आपल्या स्मार्टफोनवर अश्लील चित्रफीत बघत असताना त्यांचे चित्रीकरण टीव्ही वाहिन्यांनी करून आपल्या वाहिन्यांवरून प्रसृत केले व कोणत्या कारणासाठी या मंडळींना हे स्मार्टफोन खरे तर हवे होते याचा उलगडा झाला. (आणखी...)
- काही वर्षांपूर्वी हैदराबादला गेलो होतो त्या वेळी, तिथले जगप्रसिध्द सालारजंग संग्रहालय नव्या वास्तूत गेले आहे असे समजल्याने, लक्षात ठेवून ते मुद्दाम परत बघायला गेलो होतो. तिथली दालने बघत असताना एका दालनात खुद्द निझाम व त्याचे सरदार यांचे रत्नखचित अंगरखे चौकटींच्यात मांडून ठेवलेले दिसले.ह्या अंगरख्यांवर सोन्या-चांदीच्या तारेने कशीदा तर काढलेला होताच पण त्या शिवाय निरनिराळी रत्नेही जडवलेली होती. दिव्यांच्या प्रकाशात हा कशीदा व रत्ने मोठी चमचम करताना दिसत होती. त्याच वेळी मनात विचार आला होता की असे चौकटीत मांडून ठेवलेले हे अंगरखे बघायला जरी मोठे मोहक दिसत असले तरी ते अंगाखांद्यावर वापरणे मोठे कर्म कठिण काम आहे. अंगाला तो कशीदा सारखा घासणार, ती रत्ने उठता बसताना टोचणार, वेळप्रसंगी अंगातून रक्तही काढणार. तेंव्हा त्यांच्यापासून मी लांब आहे तोच बरा. परवा सहज विचार करत असताना असे लक्षात आले की अरे! आपली नाती गोती पण या अंगरख्यांसारखीच आहेत की! जोपर्यंत ती लांब चौकटीत मांडलेली होती तोपर्यंत अशीच मनाला सुखद वाटत होती. अंगाखांद्यावर वावरण्याची वेळ आल्यावर ती पण अशीच घासू आणि टोचू लागली आहेत. एखादे वेळी ओरखडा व रक्ताचा थेंब सुध्दा दिसतो आहे. ग़ोत्यांत नेतात ती नाती हे मनाला पटू लागले आहे. (आणखी...)
1 comment:
काल टीव्ही वर एक कार्यक्रम बघतांना छान वक्तव्य कानी पडल, माननीय सर्वोच्च न्यायालयाने १९९२ मध्ये एका खटल्यात आरक्षणाचा खरा हेतू स्पष्ट केला होता तो असा..
आरक्षण म्हणजे काही "गरिबी हटाव" चा कार्यक्रम नाहीये, आरक्षणाचा मूळ हेतू म्हणजे वर्षानुवर्षे येथील सामाजिक परिस्थितीमुळे मागासलेल्यांना प्रत्येक क्षेत्रात प्रतिनिधित्व देणे हा होय. ज्या वेळी शासनाच्या आणि प्रशासनाच्या विविध स्तरावर आरक्षणामुळे वंचित घटकांना प्रतिनिधित्व मिळेल तेव्हाच ते एकूण या राष्ट्रीय विकासाच्या प्रक्रीयाम्ध्ये सहभागी होऊ शकतील, आणि हा देश - हि व्यवस्था माझी आहे अशी भावना त्याच्या मध्ये जागृत राहील.
आरक्षण म्हणजे काही चपराशी किंवा तत्सम नौकर तयार करण्याचे मध्यम नाहीये तर एकूणच निर्णय प्रक्रियेत सर्व घटकांना सामावून घेणे हे आहे. सबंध देशामध्ये आरक्षणामुळे हजारो वर्षे व या व्यवस्थेपासून दूर ठेवलेल्यांना या व्यवस्थेचा अविभाज्य घटक होता आलं आणि या द्वारे त्यांचा पर्यायाने भारतीय समाजाचा विकास झाला.
आरक्षण देतांना गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागासालेल्यांचे पण प्रतिनिधित्व असायला हवे, त्या साठी आर्थिक निकषांवर सुद्धा आरक्षण देता येऊ शकते पण आरक्षणाच्या मूळ सामाजिक हेतूला कुठलाही धक्का न लागू देता.
आरक्षणामुळे गुणवत्ता प्रभावित होते या तर्कालाही कसला आधार नाहीये, कारण आज देशाच्या सबंध निर्णय क्षमता असणाऱ्या पदांवर बोटावर मोजण्या इतकेच मागासवर्गीय अधिकारी आहेत आणि उर्वरित ९० टक्क्यांहून जास्त हे तत्सम उच्च वर्गातून आहेत तरी हि आपण एकूणच आपल्या प्रशासनाची गुणवत्ता बघू शकतो.
आरक्षण या विषयावर नेहमी वाद घालण्या पेक्षा त्या मागील मूळ हेतू समजून भारतीय समाज कसा मजबूत करता येईल हे सकारात्मक दृष्टीने पहिले पाहिजे.
अजूनही आदिवासी, भटके, विमुक्त आणि इतर मागासवर्गीय लोकांचे जीवनमान बघा.. कुठल्या संध्या त्यांना प्राप्त होतात, सर्व म्हणतात द्या न त्यांना संध्या, शिकायला पाठवा वैगेरे वैगेरे पण सत्य परिस्थती पहिली तर त्या सर्व कार्यासाठी लागणारा पैसा किती प्रमाणात दिला जातो हे हि पहिले पाहिजे. आणि मिळणाऱ्या पैश्यात ज्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो त्यातून कसा ह्या सर्व वंचितांचा विकास साधता येईल आणि कधी त्यांना समान स्तरावर आणता येईल याचा विचार अपान सर्वांनी करावा.